शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:31 IST

मनुष्याप्रमाणेच पाळीव प्राणीही अनेक घरांमध्ये अविभाज्य सदस्य मानला जातो

सुरेश लाेखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मनुष्याप्रमाणेच पाळीव प्राणीही घरातील अविभाज्य सदस्य मानला जातो. त्यांनाही सन्मानाने शेवटचा निरोप देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात आता पाळीव प्राण्यांसाठी विशेष हॉस्पिटल आणि अंत्यविधी केंद्र  उभारण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानुसार शहरांमध्ये हाॅस्पिटलसह अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

प्राण्यांच्या रुग्णालयासह त्यांच्या अंत्यविधीची संवेदनशील आणि लोकाभिमुख संकल्पना ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या अलीकडील बैठकीत मांडली. आ. निरंजन डावखरे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर पालिका हद्दीत पाळीव प्राण्यांसाठी आरोग्य सेवा आणि अंत्यविधी केंद्र उभारण्याची मागणी केली हाेती.

ठाणे जिल्ह्यात उभारली जाणार रुग्णालये

ठाणे, कल्याण-डोंबिवली व मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी हॉस्पिटल व अंत्यविधी केंद्र उभारले जाणार आहे. नगरविकास विभागाकडून या प्रकल्पासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

प्रकल्पासाठी अनुदान मंजूर

या प्रस्तावावर चर्चा करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, नगरविकास विभागामार्फत या प्रकल्पासाठी आवश्यक अनुदान मंजूर केले आहे. त्याद्वारे सहा ठिकाणी प्राण्यांच्या अंत्यविधी केंद्र उभारणीची कामे सुरू आहेत. त्यापैकी दोन केंद्रांचे काम पूर्ण झाल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. आ. कथोरे यांनी कल्याणमध्ये  जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयास अनुसरून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पालिका आयुक्तांना प्रस्तावांची तपासणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

गेल्या  25 वर्षा पासून ठाणे महानगर पालिका हद्दीत पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा या साठी आम्ही प्रयत्न केले आहेत कि एखादा तरी पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा, महानगर पालिका हद्दीत 2 % आरक्षण हे पशु पक्षी यांचे साठी भूखंड ठेवणे ही पालिकेची जबाबदारी आहे पण तसें झाले नाही.डॉ. विवेक पाटील, निवृत्त सहा. आयुक्त, महाराष्ट्र शासन

English
हिंदी सारांश
Web Title : Respectful farewell to pets; special funeral centers to be built.

Web Summary : Thane district will soon have pet hospitals and funeral centers. Deputy Chief Minister Eknath Shinde has ordered their construction. The initiative follows a proposal to provide healthcare and dignified farewells for pets in Thane, Kalyan-Dombivli, and Mira-Bhayandar, with funding already approved for the project.
टॅग्स :thaneठाणे