शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

मीरारोड येथे पालिकेकडून मोठी वृक्षतोड; बेकायदा असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 17:42 IST

मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे, नाशिक आदी महापालिकांच्या वृक्ष प्राधिकरण समित्या बेकायदा ठरवत झाडे तोडण्याचे घेतलेले निर्णय सुध्दा रद्द केले होते.

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर भागात नाला रुंदीकरणासाठी आयुक्तांच्या मंजुरीने तब्बल ६३ मोठया हिरव्यागार झाडांची कत्तल पालिकेने केल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ३० ते ४० फुट उंचीची ही झाडे होती. अस्तित्वातच नसलेली वृक्ष प्राधिकरण समिती तसेच आयुक्तांना अटीशर्तींसह २५ पर्यंतच झाडे तोडण्याचा अधिकार दिला असताना शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड महापालिके कडुन सुरुच असल्याचा आरोप केला जात आहे.मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे, नाशिक आदी महापालिकांच्या वृक्ष प्राधिकरण समित्या बेकायदा ठरवत झाडे तोडण्याचे घेतलेले निर्णय सुध्दा रद्द केले होते. तसे असताना मीरा भार्इंदर महापालिकेमध्ये मात्र सत्ताधारी व प्रशासनाच्या संगनमताने बेकायदा समिती स्थापन करुन काही हजार झाडं तोडण्याचे ठराव मंजूर करुन घेतले. त्या अनुषंगाने अगदी ५० - ६० वर्षांची जुनी अवाढव्य झाडं सुध्दा पालिकेने कापून काढली.विविध कारणांनी झाडांची बेसुमार कत्तल करुन शुध्द हवा, सावली व वातावरणातील थंडावा नष्ट केला जात आहे. या झाडांवर अवलंबुन असणारे विविध जातीच्या पक्षी, प्राण्यांचे निवारे पालिका उध्वस्त करत आहे. कामे, इमारतीं वा मोकळ्या भुखंडातील झाडे तोडण्याचा सपाटाच पालिकेने लावला असून अशी मोठमोठी हिरवीगार झाडं होण्यासाठी अनेक वर्ष लागणार आहेत, असा संताप जागरुक नागरीक करत आहेत.त्यातच पालिकेच्या बेकायदेशीर असलेल्या समतीचा देहरादुन आदी पर्यटन ठिकाणी गेलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. बेकायदा समिती, घेतलेले निर्णय व अभ्यास दौरयाचा खर्च वसुल करण्याची मागणी माधवी गायकवाड सह शिवसेना नगरसेविका स्रेहा पांडे, जिद्दी मराठा संस्थेचे प्रदिप जंगम यांनी सुध्दा तक्रारी केल्या होत्या.समितीची मुदत संपल्यानंतर आता नव्याने समितीसाठी आवश्यक स्विकृत सदस्य पालिकेला सापडलेले नाही. त्यामुळे समिती अस्तीत्वात नाही. महापालिका प्रशासन मात्र सातत्याने झाडं तोडण्याच्या मंजुरया देत सुटले आहे. शांती नगर सेक्टर १ व २ ते दहाच्या दरम्यान तर तब्बल ६३ झाडं आयुक्तांच्या परवानगीने तोडण्यात आली आहेत. त्यासाठी समितीने आयुक्तांना अधिकार दिल्याचा हवाला दिलाय.सेक्टर १ च्या कोपऱ्या पासुन ते सेक्टर १० पर्यंत नाला आहे. या ठिकाणी मोठा नाला बांधण्यासाठी अमृत योजनेतुन मंजुरी घेण्यात आली आहे. काही कोटींचे हे काम असल्याने अनेकांचे डोळे लागले आहेत. पालिका व नगरसेवक नाला मोठा हवा यासाठी आग्रही असताना स्थानिक अनेक नागरिकांनी मात्र केवळ टक्केवारीसाठीचा खटाटोप असल्याचा आरोप केलाय. सद्याचा नाला पुरेसा असुन चांगल्या स्थितीत आहे. मग तो तोडुन मोठा नाला कोणाला हवाय ? असा सवाल त्यांनी केलाय. 

महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमा नुसार विकास कामां मध्ये अडथळा ठरणारी झाडं तोडण्यास मंजुरी देण्याचे आयुक्तांना अधिकार आहेत. सदर नाल्याचे काम शासनाच्या अमृत योजनेतुन मंजुर झालेले आहे.

- बालाजी खतगावकर ( आयुक्त ) मीरा भार्इंदर ही झाडं, पर्यावरणाच्या मुळावर उठलेली महापालिका आहे. आयुक्त खतगावकर जर त्यांना अधिकार आहे असं म्हणत असतील तर लाजीरवाणं आहे. आयुक्तांना फक्त २५ झाडांच्या मर्यादेतच अधिकार असुन त्यासाठी मार्गदर्शकतत्वे घालुन दिलेली आहेत. आयुक्त व संबंधितांवर फौजदारी व प्रशासकिय कारवाई झाली पाहिजे.

- रोहित जोशी ( उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते )येथील नाला सुस्थितीत असताना आणखी मोठा नाला कशासाठी ? महापालिका सातत्याने झाडं तोडुन पर्यावरणाचा रहास करत आहे. मीरा रोड भकास करायला घेतलं आहे. लोकांचा स्वच्छ श्वास घेण्याचा घटनात्मक अधिकार हिरावुन घेत आहेत.

- डॉ. जितेंद्र जोशी ( स्थानिक नागरीक )झाडांची बेसुमार कत्तल करुन पशुपक्ष्यांचे निवारे उध्वस्त करण्याचे पाप पालिका व लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यांचा विकास केवळ गल्लाभरु व टक्केवारीचा आहे. लोकांना शुध्द हवा , सावली व पोषक वातावरणच मिळणार नाही.

- प्रदिप जंगम ( सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार )

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर