शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

Thane News: दिव्यातील पाणी समस्या; पाण्यासाठी भाजपचा महापालिकेवर हंडा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:35 IST

Thane News: दिव्याला मंजुर असलेल्या पाण्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत आहे. मागील कित्येक वर्षापासून सुरु असलेले रिमॉडेलींगचे कामही अपूर्ण आहे.

ठाणे  - दिव्याला मंजुर असलेल्या पाण्यापेक्षाही कमी पाणी पुरवठा होत आहे. मागील कित्येक वर्षापासून सुरु असलेले रिमॉडेलींगचे कामही अपूर्ण आहे. तसेच सत्ताधा-यांच्या मर्जीनुसार येथे पाण्याचे वॉल खुले केले जातात, अशा वॉलमनची बदली करण्यात यावी आदींसह पाण्याची समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी या मागणीसाठी बुधवारी दिव्यातील रहिवाशांसह भाजपने ठाणो महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी एका महिन्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे. मात्र तरीसुध्दा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र पालिका अधिका-यांना खुर्चीत बसू दिले जाणार नसल्याचा गंभीर इशारा माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण, संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी यावेळी दिली.

 नितीन कंपनी ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिका मुख्यालयासमोर आल्यानंतर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच यावेळी हातात आणलेले मडकी फोडून दिवा वासियांनी प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर भाजपच्या शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी पाण्याची समस्या केव्हा सुटणार, रिमॉडेलींगचे काम का थांबले, ते केव्हा पूर्ण होणार, कोणत्या कारणासाठी हे काम थांबले आहे, किती टक्के काम पूर्ण झाले असा अनेक सवाल यावेळी आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केले. त्यावर एमआयडीसीकडून दिव्याला वाढीव पाणी मिळणार आहे, सध्या या भागासाठी 35 दशलक्ष लीटर पाणी मंजुर असून 29 दशलक्ष पाणी पुरवठा होत आहे. जलवाहीनी टाकण्याचे काम सध्या अपूर्ण आहे, त्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल असा दावा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी विकास ढोले यांनी केला. परंतु हे काम केव्हा पूर्ण होणार, एमआयडीसीकडून वाढीव पाणी मिळेल असे सांगितले जात असले तरी जे मंजुर आहे, तेवढे पाणी तर द्या अशी मागणीही यावेळी या शिष्ठमंडळाने केली. तर ठेकेदाराचे ६५ कोटींचे बील देणो शिल्लक असल्याने हे काम मार्गी लागू शकले नसल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले. परंतु हे बील कधी अदा केले जाणार असा सवालही यावेळी चव्हाण यांनी केला. त्यानुसार लवकरच हे बील अदा केले जाणार असून शिल्लक कामही येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. त्यानुसार शिष्ठमंडळाने हे आश्वासन मान्य करीत आंदोलन मागे घेतले.

नवीन कनेक्शनसाठी १ लाख, टॅंकर माफीयांचा सुळसुळाटदिव्यात नवीन कनेक्शन हवे असल्याने त्यासाठी माजी नगरसेवकांची माणसे एक लाख रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप यावेळी दिवा मंडल अध्यक्ष रोहीदास मुंढे यांनी केला. तसेच टॅंकर माफीया देखील पाणी चोरुन विकत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अन्यथा अधिका-यांना खुर्चीवर बसू देणार नाही दिव्याची पाणी समस्या एका महिन्यात मार्गी लागली नाही तर महापालिका अधिका:यांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही. असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपाdivaदिवा