शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली लाखोंचा गंडा; अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:57 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी याप्रकरणी आदेश देताच श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणातील पहिला गुन्हा दाखल केला आहे.

जितेंद्र कालेकर -ठाणे : सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून नामांकित वैद्यकीयमहाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली राज्यभरातील पालक तसेच विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अखेर सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी याप्रकरणी आदेश देताच श्रीनगर पोलिसांनी या प्रकरणातील पहिला गुन्हा दाखल केला आहे.‘वैद्यकीय प्रवेशाच्या नावाने राज्यातील विद्यार्थ्यांना गंडा, ठाण्यातील खासगी संस्थेने गाशा गुंडाळला, तक्रारीऐवजी पालकांचीच घेतली शाळा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या १८ एप्रिल २०२२ च्या अंकामध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. मुंबईतील परळ येथील रहिवासी धर्मेंद्र जैन  यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १९ जानेवारी २०२२ ते १८ एप्रिल २०२२ यादरम्यान वागळे इस्टेट येथील मेरिट ब्ल्यू इंडिया प्रा. लि. या खासगी कंपनीतील करणसिंग भदोरिया, शोभा राठोड आणि रजनीश पटेल यांनी आपसात संगनमत करून या कंपनीद्वारे एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असा दावा केला. त्यासाठी त्यांच्याकडून धनादेशाद्वारे तीन लाखांची रक्कमही घेतली. मात्र, ठरल्याप्रमाणे प्रवेश मिळवून न देता या रकमेचा त्यांनी अपहार केला. 

असा घातला गंडा -- जैन यांच्या मुलाचा नीट परीक्षेमध्ये राज्यात २१ हजारावा क्रमांक आला. एमबीबीएससाठी गुणवत्ता यादीत त्याचे नाव आलेच नाही. - मात्र २९ जानेवारी २०२२ रोजी जैन यांना ठाण्यातील मेरिट ब्ल्यू इंडियाच्या कंपनीतून सोनम नामक महिलेने फोन करून तुमच्या मुलाला एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्यांना काही महाविद्यालयांची नावे देण्यात आली. - प्रवेशासाठी तीन लाखांची रक्कम मेरिट ब्ल्यूच्या नावाने तर सहा लाख ६० हजारांचा डीडी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या नावाने देण्यास ८ एप्रिल २०२२ रोजी सांगण्यात आले. - धनादेश वटल्यानंतर मात्र डीडी बनवू नका असा मेसेज त्यांना या कंपनीतून आला. १७ आणि १८ एप्रिल रोजी ठाण्यातील संबंधित कार्यालय बंद आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला.- यात पुणे, अकोला, जळगाव अशा राज्यभरातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली असून हा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता पालकांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसcollegeमहाविद्यालयMedicalवैद्यकीय