शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

ठाण्यात सव्वादोन लाख अनधिकृत बांधकामे

By admin | Updated: November 4, 2015 23:38 IST

ठाणे महापालिकेतील आणखी ११ नगरसेवकांवर अशा प्रकारे कारवाईची टांगती तलवार कायम आहे. यामध्ये शिवसेनेचे आठ, मनसेचे दोन आणि राष्ट्रवादीच्या चार

- अजित मांडके,  ठाणेठाणे महापालिकेतील आणखी ११ नगरसेवकांवर अशा प्रकारे कारवाईची टांगती तलवार कायम आहे. यामध्ये शिवसेनेचे आठ, मनसेचे दोन आणि राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा समावेश आहे. २०१२ मध्ये ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे आठ, मनसेचे दोन, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांच्या विरोधात अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. अनधिकृत बांधकामात प्रत्यक्ष सहभाग अथवा अनधिकृत बांधकाम पाडकामात अडथळा, आदींसह इतर तक्रारींच्या बाबतीत या ११ नगरसेवकांवर ठपका ठेवला आहे. त्यानुसार त्यांच्यावर देखील अशाच प्रकारे कारवाई होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे. यातील काही तक्रारींवर प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप तक्रारदार करीत आहेत. अतिक्रमण विभागाकडून प्रभागस्तरावरील अहवाल प्राप्त व्हावा यासाठी वारंवार स्मरणपत्र देण्यात आलेली असताना अहवाल देण्यात येत नसल्याची बाब समोर येत आहे.आजच्या घडीला शहरात २ लाख २४ हजार ७०३ अनधिकृत बांधकामे असून त्यात ५३४२ इमारतींचा समावेश असल्याचे पालिकेची आकडेवारी सांगते. तर मागील वर्षभरात केलेल्या कारवाईत जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत ५ हजार ९५९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून ठाण्याला अनधिकृत बांधकामांची समस्या भेडसावत आहे. याच अनधिकृत बांधकामांमुळे मागील २० वर्षात १७५ जणांचा नाहक बळी गेला असून १३७ जण जखमी झाले आहेत. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीत क्लस्टरची योजना पुढे आली असली तरी तिची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आजही हा प्रश्न सुटू शकलेला नाही. दरम्यान आजघडीला शहरात २ लाख २४ हजार ७०३ अनधिकृत बांधकामे असून यामध्ये १९९५ पूर्वीची १ लाख ७ हजार ५४२ आणि त्यानंतरची १ लाख १७ हजार १६१ बांधकामे आहेत. तर २ हजार पूर्वीची २ हजार २९३ बांधकामे आहेत. दरम्यान सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणांचाही सर्व्हे केला असून यामध्ये शासनाच्या जागेवर १९ हजार ८११, एमआयडीसी २५ हजार ६३०, वनविभाग १३ हजार ८२४ बांधकामांचा समावेश आहे. (संबंधित वृत्त पान ५ वर)अनधिकृत इमारतींचा तपशील पालिकेच्या २०१४ च्या आकडेवारीनुसार शहरात आजच्या घडीला ५३४२ अनधिकृत इमारती असून यामध्ये सर्वाधिक इमारती या मुंब्य्रात असून येथे १८६६, नौपाडा - ३९९, कोपरी - ७०, वागळे -१०४८, उथळसर - ५५२, कळवा -५३४, माजिवडा - मानपाडा - २९५, वर्तकनगर - २८७ इमारती आहेत. मालमत्ता विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार...ठाणे शहरात मालमत्ता कर विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात अधिकृत करदाते हे ९६ हजार १३१ असून अनधिकृत करदात्यांची संख्या ही २ लाख २८ हजार ९२२ एवढी आहे. त्यात १ लाख २३ हजार ७८० ही अनधिकृत बांधकामांची संख्या असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली. या आकडेवारीवरुनच शहरातील अनधिकृत बांधकामांचा आलेख गेल्या काही वर्षात कसा वाढला याची दाहकता दिसून येते. विशेष म्हणजे मुंब्रा भागात २१ हजार ७०९, कौसामध्ये १५ हजार १८३, शीळमध्ये ५२२४ आणि दिव्यात २६ हजार ८३० अनधिकृत मालमत्ताधारक असल्याचे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ मध्ये केलेल्या कारवाईचा तपशीलप्रभाग समितीकारवाई रायलादेवी३६नौपाडा१०१३कोपरी१०४वागळे७१उथळसर२२कळवा८६६माजिवडा-मानपाडा२२३मुंब्रा१७९८वर्तकनगर११०२लोकमान्य नगर ७२४एकूण ५९५९बांधकामांचा तपशील...प्रभाग समितीबांधकामे रायलादेवी४७५४१नौपाडा१०९६७कोपरी७३९२वागळे६७११उथळसर१०३१०कळवा३४९९७माजिवडा-मानपाडा२९३५६मुंब्रा४४७२९वर्तकनगर३७७००