शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात प्रचंड हुशारी मात्र वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव- दा.कृ. सोमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 18:32 IST

भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका.

डोंबिवली: भारत देश कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता आहे. प्रसारमाध्यमातील बातम्या वाचून तुम्ही नकारात्मक दृष्टीकोन करून घेऊ नका. भारतातील संशोधकाकडे प्रचंड हुशारी आहे. आपण चंद्रावर आणि मंगळावर यान पाठवितो. आपल्या शास्त्रज्ञांनी ते यान पृथ्वीभोवती प्रथम फिरत ठेवले त्यामुळे त्याला उर्जा कमी लागली. त्यामुळे या मोहिमा कमी खर्चात पार पडल्या, असे मत खगोलशास्त्रज्ञ दा.कृ. सोमण यांनी व्यक्त केले. पंचायत समिती कल्याण (शिक्षण विभाग), रॉयल इंटरनॅशनल स्कूल व गणित विज्ञान मंडळ, कल्याण-डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 43 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन रॉयल इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन दा.कृ  सोमण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सोमण म्हणाले, भारतात पूर्वी सुईदेखील उत्पादित होत नव्हते. अन्नधान्य आपण अमेरिकेकडून आयात करीत असू. तांदूळ दुकानात दिसत नसे. आम्ही दोन किलो तांदूळ घेण्यासाठी लांबच्या शहरात जात असे. हे सांगण्यामागे उद्देश विद्याथ्र्याना भारताची काय परिस्थिती होती हे सांगायचे आहे. आता शेती अपारंपारिक पध्दतीने केली जाते. आपल्या जनतेला अन्नधान्य पुरवून उर्वरित माल निर्यात केला जातो. एवढी क्षमता भारतात आज निर्माण झाली आहे. आपण चंद्रयान प्रथम सोडले आणि चंद्राच्या उत्तर ध्रुवात पाणी आहे हे सांगितले. हेच सांगण्यासाठी अमेरिकाला 3क् वर्ष लागली. ज्या ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केले त्यांचे यान इस्त्रो ही संस्था सोडते. आईवडिलांनी मुलांना वाढदिवसाला पुस्तक भेट म्हणून द्यावे. कारण नारळीकर आणि गोवरीकर कदाचित तुमच्या घरात वाढत असतील, असे सांगितले