शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पैशाअभावी महिलेने रस्त्यात दिला बाळाला जन्म; डॉक्टरने वेळीच मदत केल्यामुळे वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 01:33 IST

कोरोना चाचणीसाठी पैसे नाहीत

- कुमार बडदे मुंब्रा : कोरोना चाचणी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यास उशिर झाला आणि त्यामुळे तिने रस्त्यामध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी घडली. प्रसुतीनंतर बाळाची नाळ पोटातच राहिल्याने तिची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. मात्र जवळच्याच एका खाजगी डॉक्टरने मदत केल्यामुळे तिचा जीव वाचू शकला.

मुंब्य्रातील कौसा भागातील चर्णीपाडा परीसरात राहत असलेल्या राजुलन्निसा अहमद या गर्भवती महिलेवर येथील खाजगी रुग्णालयात औषधौपचार सुरु होते. तिची प्रसुतीची तारीख जवळ आल्याचे कळताच चार दिवसांपूर्वी तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिचा पती इसरारला तिची कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. सुतारकाम करणारा इसरार लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून बेरोजगार आहे. त्यामुळे चाचणीसाठी पैसे कुठून आणायचे, या विवंचनेत प्रसुतीची तारीख उलटून गेली.

अखेर शुक्रवारी रात्री तिला वेदना असह्य झाल्यानंतर त्याने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तिला नेण्याचा निर्णय घेतला. मात्र रात्री एक वाजता वाटेतच तिने मुंब्य्रातील रशिद कम्पाउंड परीसरातील रस्त्यावर बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर नाळ मात्र तिच्या पोटात राहिली होती. त्यामुळे तिला असह्य वेदना होत होत्या. घामाघूम होऊन तिचा चेहरा पांढरा पडला होता. हा भाग जर आणखी काही काळ तिच्या पोटात राहिला असता तर तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती.

काही जागरुक नागरिकांनी घटनास्थळापासून जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टर इमरान खान यांना ही बाब सांगितली. तिची अवस्था बघून काही काळ काय करावे, हे त्यांनाही सुचत नव्हते. परंतु प्रसंगवधान राखून त्यांनी त्यांच्या रुग्णालयातील एका परिचारीकेच्या मदतीने तिच्या पोटातील नाळ व्यवस्थित बाहेर काढून तिचा जीव वाचवला.

सर्व स्तरांतून कौतुक

एकीकडे मुंब्य्रातील काही रुग्णालये कोरोनाच्या चाचणीच्या नावाखाली इतर आजार असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत. यामुळे उपचाराअभावी नुकताच एका १३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खान यांनी मात्र संबधित महिलेची कोरोना चाचणी झाली आहे की नाही, याचा विचार न करता डॉक्टर म्हणून जे कर्तव्य पार पाडले, त्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे