शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

दरमहिन्याला ३०० रक्तदात्यांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:46 IST

रक्तपेढीत वर्षभरात १५ हजार दात्यांकडून रक्तदान केले जाते. त्यात स्वत:हून रक्तदान करणारे आणि शिबिरांमध्ये रक्तदान करणारे आहेत. पण, हा आकडा पुरेसा नाही.

डोंबिवली : रक्तपेढीत वर्षभरात १५ हजार दात्यांकडून रक्तदान केले जाते. त्यात स्वत:हून रक्तदान करणारे आणि शिबिरांमध्ये रक्तदान करणारे आहेत. पण, हा आकडा पुरेसा नाही. महिन्याला २०० ते ३०० रक्तदात्यांची कमतरता भासत आहे. काही ठरावीक दातेच रक्तदान करतात. मुबलक रक्तपुरवठा होण्यासाठी रक्तदानाविषयी जागृतीची गरज आहे, असे मत प्लाझ्मा रिसर्च ट्रस्ट रक्तपेढीचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र भागवत यांनी व्यक्त केले.रक्तदान केल्यानंतर त्याचे विघटन कसे केले जाते, रक्ताचा तुटवडा आणि रक्तपेढींची माहिती जाणून घेण्यासाठी डोंबिवली पत्रकार संघातर्फे प्लाझ्मा रक्तपेढीत शुक्रवारी वार्तालापाचा कार्यक्रम झाला. यावेळी भागवत बोलत होते. संस्थेच्या मुख्य पॅथॉलॉजिस्ट डॉ. एच.ए. शाह, डॉ. अपर्णा बागुल, मुख्य व्यवस्थापक अर्पिता दिघे उपस्थित होते.भागवत म्हणाले, ‘प्लाझ्मा रक्तपेढी २५ वर्षांपासून १२५ थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्त देत आहे. सलाइनद्वारे लाल रक्तपेशी दिल्या जातात. ही सेवा थॅलेसेमिया रुग्णांना मोफत दिली जाते. ‘सिंगल डोनर प्लेटलेट’ सुविधा या रक्तपेढीत आहे. त्यासाठी विशेष मशीन बसवली आहे. आयएच-१००० या अमेरिकन रोबॉटिक हॅण्ड्स मशीन पद्धतीने ओ. बी. ए. आणि एबी रक्तगटांव्यतिरिक्त केल, डफी, कीड अशा १० प्रकारच्या नव्या रक्तगटांचे वेगळेपण या रक्तपेढीत केले जाते. येथील स्वयंचलित मशिनरीमुळे रक्तातील एचआयव्ही व इतर धोका कमी होतो.’‘रक्तदानानंतर दात्याला व्हीओएलकार्ड दिले जाते. प्लाझ्मा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा होत नाही. पण, उन्हाळ्यात व डेंग्यू आदी साथींच्या आजाराच्या काळात रक्तदान कमी झाल्यास रक्ततुटवडा जाणवतो. यामुळे मुबलक रक्तपुरवठा व्हावा, यासाठी रक्तदानाच्या जागृतीची गरज आहे. ट्रस्टने त्यासाठी मेडिकल सोशल वर्करची नेमणूक केली आहे. घरी जाऊन रक्तदात्यांकडून रक्त घेण्याची सुविधाही ट्रस्टतर्फे पुरवली जाते. तसेच डोंबिवली ते कर्जतपर्यंत रक्तपुरवठा केला जात आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या काळात ट्रस्टने मोफत रक्तपुरवठा केला होता. सरकारी रुग्णालयांना वेळोवेळी रक्तपुरवले जाते,’ असे भागवत म्हणाले.दात्याने रक्तदान केले तरी २५ ते ३० टक्के दात्यांचे रक्त अनेक कारणांनी नाकारले जाते. त्यांच्या रक्तात हिमोग्लोबीन कमी असते, उच्च रक्तदाब अशा अनेक कारणांमुळे त्यांचे रक्त अयोग्य ठरते.निगेटिव्ह रक्ताची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्यास आम्ही दात्यांना फोन करून ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी ‘ए’ आणि ‘बी’ पॉझिटिव्ह रक्ताचीही कमतरता भासते. कधीकधी ‘ए’ या एकाच गटाचे रक्तदाते दिवसभरात येतात. त्यामुळे इतर गु्रपची कमतरता निर्माण होते, असे भागवत म्हणाले.प्लेटलेट या पाच दिवसांच्या आतच रुग्णांसाठी वापरल्या जाऊ शकतात. या काळात रुग्णांना गरज न भासल्यास त्या फेकून द्याव्या लागतात. १०० प्लेटलेटमधून ७० प्लेटलेट फेकून दिल्या जातात. तर, केवळ ३० प्लेटलेट उपयोगात येतात. पण आम्हाला अचानक गरज उद्भवू शकते. त्यामुळे त्या रक्तपेढीत उपलब्ध करून द्याव्या लागतात.