शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 01:19 IST

तोल गेल्याने खाली कोसळून कुरबान मुजीबर मंडल (३६, मूळ रा. पश्चिम बंगाल) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास घडली.

ठाणे : वर्तकनगर येथील संदेश हाइट्स येथील सातव्या मजल्यावरील लाकडे गोणीत भरून घेत असताना तोल गेल्याने खाली कोसळून कुरबान मुजीबर मंडल (३६, मूळ रा. पश्चिम बंगाल) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी बांधकामाचा पर्यवेक्षक सलीम शेख याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.वर्तकनगर येथे आदित्य एंटरप्रायजेसतर्फे संदेश हाइट्स या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. १७ जुलै रोजी या बांधकामाच्या साइटवरील पर्यवेक्षक शेख याने कुरबान या बिगारी कामगाराला इमारतीच्या सातव्या मजल्यावरील लाकडे गोणीत भरून आणण्यास सांगितले होते. ही लाकडे तो गोणीत भरून घेत असतानाच तोल गेल्याने इमारतीवरून खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या साइटवर कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप कुरबान मंडल याचा मेहुणा कुतुबुद्दीन सरदार याने केला आहे.