शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

शिवसेना-भाजपविरोधात कामगार संघटना एकवटल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:26 IST

सध्याचे केंद्रातील भाजप सरकार कामगारविरोधी असल्याचा आरोप करून येथील विविध कामगार संघटना एकत्र आल्या.

ठाणे : सध्याचे केंद्रातील भाजप सरकार कामगारविरोधी असल्याचा आरोप करून येथील विविध कामगार संघटना एकत्र आल्या. निवडणुकीच्या या कालावधीत त्यांनी शिवसेना-भाजपाविरोधात विविध उपक्रम हाती घेऊन मतदारजागृती सुरू केली. केंद्रातील सध्याच्या सरकारविरोधात ‘कामगारांचा ठाम निर्धार, आता भाजपाला करा सत्तेतून हद्दपार’ आदी घोषणांची पत्रकेही त्यांनी वाटपास प्रारंभ केला आहे.सत्ताधारी पक्षांचे उमेदवार चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार करून मतदारांना आपलेसे करत आहेत. मात्र, याच कालावधीत ‘कामगार संघटना संयुक्त कृती समिती’ गठीत करून त्याखाली कामगार संघटना सत्ताधारी पक्षांच्या उमेदवारांसह प्रचाराविरोधात एकवटल्या आहेत. यामध्ये इंटक, हिंद मजदूर सभा, सिटू, एनटीयूआय, टीयूसीआय, एआयसीसीटीयू, मानवी हक्क अभियान, म.रा. कामगार संघटना कृती समिती, भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक जनता संघटन, ओबीसी संघर्ष समन्वय समिती, ठाणे मेडिकल असोसिएशन, घोडबंदर रोड हाउसिंग सोसायटी वेल्फेअर असो. आदी संघटनांचा समावेश आहे.केंद्रातील सरकार म्हणजे झूट-लूट-फूटचे सरकार, कामगारांचा ठाम निर्धार भाजपाला करा सत्तेतून हद्दपार, आदींद्वारे सत्तेतील सरकार हद्दपार करण्याचे मुद्दे पटवून दिले जात आहे. पत्रकेवाटपासह कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सरकारविरोधात मतदान करण्याचे सांगितले जात आहे. गडकरी रंगायतनमध्ये नुकतेच कार्यकर्ता मेळावाही पार पडला. कामगार मेळावे, मीटिंग घेऊन आणि वस्त्यावस्त्यांमध्ये पदयात्रा काढून मतदारांमध्ये जागृती केली जात आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे