शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत महापालिका प्रशासना विरोधात लेबर फ्रंटचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By नितीन पंडित | Updated: November 9, 2023 17:25 IST

अर्थसंकल्पात मागील वर्षी ४ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद असताना ११ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते.

भिवंडी : महानगरपालिकेतील कामगार संघटनांच्या कृती समितीने पालिका प्रशासन सोबत केलेल्या चर्चेत कामगारांना दिवाळीपूर्वी १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती.परंतु भिवंडी पालिका प्रशासनाने कृती समिती मधील  काही मोजक्या कामगार संघटनांना हाताशी धरून घाईघाईत १३ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली .या विरोधात लेबर फ्रंट कामगार युनियन सोबत मनसे महानगरपालिका कामगार संघटना व अखिल भारतीय मजदुर काँग्रेस संघटनेच्या सदस्य कामगारांनी विरोध केला असून पालिकेच्या या मनमानी कारभारा विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर लेबर फ्रंटचे अध्यक्ष ऍड. किरण चन्ने यांच्या नेतृत्वा खाली गुरुवारी मोर्चा काढून पालिका प्रशासनाचा धिक्कार केला आहे.यावेळी मनपा प्रशासन व मनपा आयुक्त अजय वैद्य यांचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात संतोष चव्हाण ,मनसे महानगरपालिका कामगार संघटनेचे संतोष साळवी,अखिल भारतीय मजदुर काँग्रेस संघटनेचे राजू चव्हाण यांसह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.

अर्थसंकल्पात मागील वर्षी ४ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद असताना ११ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. तर यावेळी अर्थसंकल्पात ६ कोटी रुपयांची तरतूद केल्याने पालिकेतील ४२२५  कामगारांना १४ हजार २०० रुपयांची तरतूद केली आहे.त्यामध्ये एक हजार रुपये वाढ करून १५ हजार २०० रुपयांची मागणी केली असताना,काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून प्रशासना कामगारांची फसवणूक करीत असल्याचा आरोप करीत येत्या दोन दिवसात प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर ऐन दिवाळीत कामगार काम बंद आंदोलन करतील असा इशारा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात अँड किरण चन्ने यांनी दिला आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडी