शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी प्रभाग समिती इमारतीच्या बाहेरील भागाचा एलीव्हेशन पिंथ कोसळला, जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 18:19 IST

या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती. तसेच धोकादायक भाग पाडण्यचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले होते.

ठाणे- गेल्या चार-पाच महिन्यापूर्वी, ठाणे पूर्व भागातील कोपरी प्रभाग समितीच्या इमारतीमध्ये, आरोग्य विभागातील कर्मचारी कक्षाचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली होती. यानंतर आता सोमवारी याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील, बाहेरच्या बाजूस एलीव्हेशन पिंथ कोसळल्याची घटना घडली आहे. या घातेन सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती. तसेच धोकादायक भाग पाडण्यचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना, त्यांच्या प्रभागातच विविध दाखले आणि समस्यांचे निरसन व्हावे, यासाठी प्रभाग समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या कोपरी उपप्रभाग समितीच्या कार्यालयाची इमारत धोकादायक बनल्याचे दिसून येत आहे. त्यात या इमारतीच्या बाहेरील भागाचा सज्जा येथील अधिकाऱ्यांच्या वाहनावर पडल्याची घटना देखील घडली होती. त्यानंतर याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील आरोग्य केंद्रातील स्टाफ रुममध्ये सीलींग प्लास्टर पडल्याची घटना घडली. या घटनेने येथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यात या कक्षातील डागडुजीचे काम केल्यानंतर हा कक्षा पुन्हा सुरु करण्यात आला होता. 

दरम्यान, सोमवारी दुपारी १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास कोपरी प्रभाग समितीच्या बाहेरील बाजूचे एलीव्हेशन पिंथ कोसळल्याची घटना घडली. या घटनेत सुदैमाने जीवितहानी झाली नसली तरी, पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी उभारण्यात आलेल्या शेडवर पिंथ पडल्याने त्याचे नुकसान झाले असून एक दुचाकी व चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. तसेच धोकादायक भाग पडण्यचे काम पालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले होते.

टॅग्स :thaneठाणेBuilding Collapseइमारत दुर्घटनाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका