शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कोकण पदवीधर निवडणूक : भाजपा-शिवसेना पुन्हा खडाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 06:47 IST

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला धूळ चारुन त्या पक्षाचे नाक कापण्यात

ठाणे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला धूळ चारुन त्या पक्षाचे नाक कापण्यात अपयश आल्याने चडफड सुरु असलेल्या शिवसेनेनी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर प्रमाणेच कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेनी यापूर्वी लढवलेली नाही.येत्या २५ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये उडी घेतली. मागीलवेळी शिवसेनेनी डावखरे यांना आतून मदत केल्याने भाजपाचा परंपरात मतदारसंघात पराभव झाला होता. आता पालघरच्या पराभवाने डिवचली गेलेली शिवसेना थेट आव्हान देण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे मागीलवेळी डावखरे यांना साथ देणाºया शिवसेनेसोबत त्यांना दोन हात करावे लागणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नसून पुढील आठवड्यात ६ जूनपर्यंत जाहीर केला जाणार आहे. मात्र नगरसेवक नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे कोकण पदवीधरची निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट दिसत आहे. परिणामी या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपामध्ये ‘कांटें की टक्कर’ होणे अपेक्षित आहे.मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळेस डावखरे यांना २७ हजार, केळकर यांना २२ हजार मते पडली होती. डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला असल्याने साहजिकच पुन्हा मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.वसंत डावखरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ््याचे संबंध होते. मात्र बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन वसंत डावखरे यांना पराभूत केले होते. आता त्यांचे पुत्र निरंजन यांच्या विरोधातही शिवसेनेनी षड्डू ठोकला आहे.पालघरच्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असताना आता कोकण पदवीधरमध्ये पुन्हा खडाखडी होणे अपरिहार्य आहे. शिवसेनेची ठाण्यात ताकद आहे.नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर गणेश नाईक नवी मुंबईत त्यांच्या पाठीशी किती बळ उभे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना अलीकडे निवडणुकीत भाजपाची साथ लाभली. नारायण राणे हेही तटकरे यांच्या मदतीला धावले. त्यामुळे तटकरेत्याची परतफेड करणार की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवसेना व भाजपा यांच्यापैकी कोकणातील पदवीधरांचा अधिक पाठिंबा कोण मिळवतो, याचेही कुतूहल आहे.भाजपाने निरंजन यांना उमेदवारी दिल्याने भाजपातील ठाणे व रत्नागिरी येथील काही निष्ठावान मंडळी नाराज असल्याची चर्चा आहे.