शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

कोकणातील उद्योजक आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:54 IST

मोठा व्यवसाय किंवा एखादा छोटा उद्योग सुरु करायचा तर, त्यासाठी नोंदणी किंवा परवाना घेणे हे बंधनकारकच आहे. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागात कोकणातून सुमारे दोन

पंकज रोडेकर ठाणे : मोठा व्यवसाय किंवा एखादा छोटा उद्योग सुरु करायचा तर, त्यासाठी नोंदणी किंवा परवाना घेणे हे बंधनकारकच आहे. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागात कोकणातून सुमारे दोन लाख छोट्या-मोठ्या उद्योजकांनी अन्नासंदर्भातील आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यामुळे कोकणातील चारही जिल्ह्यात रस्त्यावरील उद्योग-धंदेवाल्यापासून ते मोठ्या उद्योजकाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे वेळेचा आणि मनुष्यबळाचा अपव्यय टळला आहे. तर, नोंद करताना जमा होणाऱ्या कागदपत्रांच्या कटकटीतून आणि पैसे भरताना जमा होणाºया बनावट नोटांचाही प्रश्न सुटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दिवसेंदिवस छोट्या-मोठ्या उद्योग-धंद्यांची संख्या वाढत असल्याने त्यांची माहिती सुरक्षितरित्या संकलित करून ठेवण्यासाठी २०१४ पासून एफडीएमध्ये आॅनलाइन पद्धत सुरु झाली. तसेच दरवर्षी साधारणत: ८ ते १० हजार उद्योजक नोंदणी किंवा परवान्यासाठी अर्ज सादर करतात. त्यानुसार, डिसेंबरपर्यंत कोकणात एक लाख ७७ हजार ३५१ इतक्या उद्योजकांची आॅनलाइन नोंद आहे. तर, आॅनलाइन पद्धत लागू झाल्यानंतर एफडीएमार्फत व्यापारी संघटनांना याबाबत प्रशिक्षण दिले आहे.त्यामुळे सध्या आॅफलाइनने कोणतीच नोंदणी किंवा परवान्याची नोंद केली जात नाही. मात्र, त्या संदर्भातील दिले जाणारे प्रमाणपत्र फक्त आॅफलाइनने दिले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे भ्रष्टाचारालाही लगाम बसल्याचे म्हणणे आहे.आॅनलाइन नोंद अर्ज करणे सुरु झाल्यापासून त्यासाठी लागणारे कागदपत्रे जमा करून ती जपून ठेवावी लागत. त्यासाठी मोठ्याप्रमाणात जागा व्यापली जात होती. तसेच वर्षांनुवर्ष ठेवलेल्या कागदावर धूळीचे साम्राज्य पसरत असे.त्यामुळे आरोग्याच प्रश्न उपस्थित होत होता. तसेच एखाद्यावेळी जुने कागदपत्रे शोधही घेणे एक कटकटच होऊन बसली होती. त्या सर्व त्रासातून आता सुटका झाली आहे.मागील वर्षभरात कोकण विभागात आॅनलाइन पद्धतीने उद्योजकांनी ८ कोटी ७३ लाख ४० हजार ८८५ भरले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ५ कोटी ८३ लाख १३ हजार ६६७, रायगड १ कोटी ९५ लाख ५४ हजार ४५६,रत्नागिरी ५९ लाख ७९ हजार ८५० तर सिंधूदुर्ग ५४ लाख ९३ हजार ९०० रुपये उद्योजकांनी नियमाप्रमाणे पैसे भरले आहेत.