शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्कच्या कोकण भरारी पथकाची मुंबईत धाड, दोन कोटीचा विदेशी मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 20:27 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय ठाणे आणि मुंबई भरारी पथकांनी अंधेरीतील एका गोदामात छापा टाकून दोन कोटींचे बनावट विदेशी मद्य हस्तगत केले.

ठळक मुद्देअगरबत्तीसोबत बनावट विदेशी मद्याचीही विक्रीअंधेरीतील दोघांना अटक वेगवेगळया कंपन्यांचे १८०० बाटल्याचे १७५ बॉक्सचा मद्यसाठा

ठाणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथक ठाणे आणि मुंबईच्या पथकांनी संयुक्तरित्या मुंबईच्या खार जिमखाना भागात रविवारी दिवसभर धाडसत्र राबवून सुमारे दोन कोटींचे बनावट विदेशी मद्य जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.खार जिमखाना येथे एक व्यक्ती बनावट स्कॉच मद्य विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक संताजी लाड यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे कोकण विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लाड, दुय्यम निरीक्षक रविंद्र पाटणे तसेच मुंबई भरारी पथक १ चे निरीक्षक मनोज चौधरी यांच्या पथकाने रविवारी रात्री ही कारवाई केली. मिळालेल्या बातमीच्या आधारे खार जिमखाना १७ वा रस्ता येथे आलेल्या पुंजालाल पटेल (रा. अंधेरी, मुंबई) याची झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीसाठी आणलेले विदेश मद्य मिळाले. त्याने हे बिपीन शहा यांच्याकडून आणल्याचे सांगितले. या पथकांनी त्यांच्याकडून आणखी मद्याची मागणी केली. शहाने अंधेरीच्या एसव्ही रोड येथील विजय सेल्स याठिकाणी येण्यास शहाने येण्यास सांगितले. बिपीन शहा याने दुचाकीवरुन आणखी मद्याच्या बाटल्या त्याने आणल्यानंतर या पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशीतून अधेरीतील अ‍ॅमरॉन्ड अपार्टमेंट मधील गाळा क्रमांक २३ मधून विदेशी स्कॉचचे १७५ बॉक्स हस्तगत करण्यात आले. भाडयाने घेतलेल्या या गाळयात अगरबत्ती विक्रीसह विदेशी मद्याचीही बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याचे शहाने चौकशीत सांगितले. दिल्लीतील अशोक नावाच्या व्यक्तिकडून हे मद्य आणल्याचेही त्याने सांगितले. या छाप्यात आयात शुल्क न भरलेल्या विदेशी स्कॉचच्या वेगवेगळया कंपन्यांचे १८०० बाटल्याचे १७५ बॉक्सचा सुमारे दोन कोटींचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्विनी जोशी आणि संचालक सुनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे