शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास कोनगांव पोलीसांनी केले जेरबंद,दोन वाहने जप्त

By नितीन पंडित | Updated: January 9, 2023 15:50 IST

एका आंतरराज्यीय इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास रविवारी अटक केली आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी:भिवंडी पोलीस परिमंडळ क्षेत्रात वाहन चोरीच्या घटना अधिक होत असताना पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे व सहाय्यक पोलीस आयुक्त शेळके यांनी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आपापल्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रगस्त व नाकेबंदी करण्याचे आदेश दिले असता कोनगाव पोलिसांनी गस्ती दरम्यान एका आंतरराज्यीय इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास रविवारी अटक केली आहे.

त्याच्या ताब्यातून चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे.ऑनअली सरफराज जाफरी वय २२ रा.पिराणीपाडा शांतीनगर असे अटक आरोपीचे नाव आहे. मोटार सायकल चोरीच्या घटनांना प्रतिबंध व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या नंतर कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शना सपोनि किरणकुमार वाघ,सपोनि अभिजीत पाटील,पोहवा पंडीत जाधव, मधुकर घोडसरे, श्याम कोळी, पोना नरेंद्र पाटील, गणेश चोरगे, नामदेव वाघ, रमाकांत साळुंखे यांनी कोनगाव परिसरात गस्त घालीत असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास वासुदेव पाटीलनगर येथे ऑनअली सर्फराज जाफरी हा संशयीत रित्या मोटार सायकलसह मिळून आला.

त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे केलेल्या तपासात कोनगांव पोलीस ठाण्यातील चोरीस गेलेल्या ९५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले.विशेष म्हणजे ऑनअली सर्फराज जाफरी हा आंतरराज्यीय इराणी टोळीतील गुन्हेगार असून त्याविरोधात या पूर्वी भिवंडी शांतीनगर ,कल्याण महात्मा फुले,कर्नाटक बिदर येथील गांधीगंज या तीन पोलीस ठाण्यात त्या विरोधात पाच गुन्ह्यांची नोंद आहे .

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bhiwandiभिवंडी