शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कोळी गीते-नृत्यांनी ठाण्यातील कोळी महोत्सवात आणली रंगत, पुष्पा पागधरेंनीही सादर केली गाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 15:51 IST

दरवर्षीप्रमाणे याही वर्ष जोशात आणि उत्साहात गावकीचा कोळी महोत्सव संपन्न झाला. यावेळी हजारो नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिली.

ठळक मुद्देपुष्पा पागधरेंच्या गाण्यांनी कोळी महोत्सवाची रंगत द्विगुणीत गावकीचा वार्षिक १५ वा कोळी महोत्सव संपन्न कोळी हंगाम्याने महोत्सवाची सांगता

ठाणे: खाद्य पदार्थांच्या मेजवानी बरोबर नृत्य, गायन, वादन, प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांनी ठाणे पुर्व येथील एक दिवसीय कोळी महोत्सव हजारो ठाणेकरांच्या उपस्थितीत रंगला. यावेळी २६ व्या गानरत्न - भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराच्या मानकरी, ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरेंच्या गाण्यांनी कोळी महोत्सवाची रंगत द्विगुणीत केली.         चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच, ठाणे (पूर्व) तर्फे गावकीचा वार्षिक १५ वा कोळी महोत्सव घाटावर (कस्टम जेट्टी) आयोजित करण्यात आला होता. पागधरे यांनी महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर रमेश नाखवा व आशिष मोरेकर यांच्या साथीने पेश केलेल्या ठसकेदार कोळी गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या महोत्सवाचे उद्घाटन प्रमिला ठाणेकर, मेघनाथ कोळी, रजनी कोळी, भागीरथी कोळी या ज्येष्ठ प्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दहा जणांचा सत्कार करण्यात आला. या दहा सत्कारमूर्तीच्या वतीने गजाननराव कोळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी सत्काराला उत्तर दिले. सनईचा सूर (तुकाराम कोळी), ठाणा कोळीवाडा (विजय ठाणेकर), गोमू माहेरला जाते (आशिष मोरेकर), धनगराची (नूतन ठाणेकर), तुझे नादान गो (सोनाली ठाणेकर) यांच्या गीतांनी तर साई श्रद्धा, दायकाशी, श्री आनंद भारती समाज, दर्याचा दरारा १० के, नॉटी बॉईज या नृत्य पथकांनी कार्यक्र माची शोभा वाढवली. प्रज्ञा भगत यांचे लावणी नृत्य अप्रतिम झाले. कोळी हंगाम्याने महोत्सवाची सांगता झाली. प्रमोद नाखवा यांनी सूत्रसंचालन केले. पारंपारिक वेशात भव्य शोभा यात्रा, कोळी व लोककलेवर आधारीत गीते, नृत्य आणि नाट्य यांचा रंगतदार कार्यक्रम, कोळी कलाकारांचे हस्त, चित्र व कला यांचे दालन, कोळी लोकजीवन, इतिहास, चळवळ यांचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे आकर्षण होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तब्बल पाच हजार नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिल्याचे आयोजक विक्रांत कोळी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्र