शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By अजित मांडके | Updated: May 31, 2023 17:54 IST

शेकडोंच्या संख्येने शेतकरी बांधव यामध्ये सहभागी झाले होते.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वन अधिकार कायद्याची न्याय अंमलबजावणी करा, कसत असलेल्या जमिनीचे संपूर्ण क्षेत्र कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावे करा, शेतीसाठी शेतकर्यांना कर्ज, विमा, नुकसान मदत, शासकीय विकास योजनेचा लाभ देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडोंच्या संख्येने शेतकरी बांधव यामध्ये सहभागी झाले होते.

ठाणे - पालघर जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी, श्रमिकांचे विविध प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालले आहेत. हे प्रश्न सुटावेत यासाठी यापूर्वी देखील शेतकरी, आदिवासी, श्रमिकांचे विविध प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या नेतृत्वाखालील मार्च २०२३ मध्ये दिंडोरी ते वशिंड असा किसान लॉंग मार्च काढण्यात आला होता. तर, एप्रिल महिन्यात अकोले ते लोणी असा भव्य पायी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राज्य शासनाने लेखी स्वरूपात मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे मान्य मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करावी, ठाणे व पालघर जिल्ह्यातील शर्मिकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडावेत यासाठी मोर्चा बुधवार ३१ मे रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी, श्रमिक सहभागी झाले होते. 

काय आहेत मागण्या

- वन अधिकार कायद्याला अभिप्रेत असल्याप्रमाणे भौतिक परिस्थितीचा वस्तुनिष्ठ पंचनाम करावा- जेष्ठ नागरिकांचा जबाब व ग्रामस्थांचे म्हणणे या पुराव्यांच्या आधारे आदिवासी व वननिवासींना न्याय द्या.- पेस कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी करा.- मनरेगा योजनेची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून मागेल त्याला काम रस्ता व वेळेवर वाढीव मोबदला द्या. - जिल्ह्यातील प्रत्येक तलाठी कार्यालयात सरकारी भात खरेदी केंद्र सुरु करावे.- भात, वरई, नागली, सवा आदी आदिवासी शेतकर्यांच्या पिकांना संरक्षण द्यावे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका