प्रांत कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची आमदार किसन कथोरेंनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 04:14 PM2020-02-08T16:14:08+5:302020-02-08T16:14:36+5:30

मुंबई वडोदरा रस्ते प्रकल्पात बाधित शेतकरी महिलेस मोबदला मिळत नसल्याने तिने कल्याण प्रांत कार्यालयात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Kisan Kathoren MLA visits suicide attempt women at province office | प्रांत कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची आमदार किसन कथोरेंनी घेतली भेट

प्रांत कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची आमदार किसन कथोरेंनी घेतली भेट

Next

कल्याण- मुंबई वडोदरा रस्ते प्रकल्पात बाधित शेतकरी महिलेस मोबदला मिळत नसल्याने तिने कल्याण प्रांत कार्यालयात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर कल्याणच्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या महिलेच्या प्रकृतीची पाहणी करण्यासाठी भाजपा आमदार किसन कथोरे यांनी आज दुपारी रुग्णालयास भेट दिली.

कल्याण तालुक्यातील रायते गावातील प्रकल्पबाधित शेतकरी महिला सुरोशी यांनी काल प्रांत कार्यालयात कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमदार कथोरे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच महिला उपचार घेत असलेल्या अतिदक्षता विभागात जाऊन पाहणी केली. तसेच डॉक्टरांशी चर्चा केली.

या प्रकरणात सगळ्य़ात प्रथम बाधित महिलेची प्रकृती सुधारणो आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांनी योग्य ते उपचार करावेत अशा सूचना डॉक्टरांना कथोरे यांनी केले आहे. भाजप पक्ष व आमदार म्हणून त्यांच्या कुटुबियांच्या पाठिशी मी आहे अशी ग्वाही आमदार कथोरे यांनी यावेळी दिली. संबंधित महिलेला मोदबला देण्याच्या प्रक्रियेत अन्यया झाला असेल तर तिला न्याय दिला जाईल. या प्रकरणी जिल्हाधिकारी राजेश नाव्रेकर आणि प्रांत अधिकारी नितीन महाजन यांच्याशी चर्चा केली आहे. या प्रकरणी बैठक करुन हा प्रश्न सोडविला जाणार आहे.

Web Title: Kisan Kathoren MLA visits suicide attempt women at province office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.