शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

इथल्या पोलिसांना जमत नसेल तर सीबीआयची मदत घेण्यास अडचण काय, किरीट सोमय्यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 14:36 IST

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध लवकर लागणे आवश्यक असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सहकार्याची भूमिका घेत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

ठाणे - अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचा तपास इथल्या पोलिसांना जमत नसेल तर सीबीआय किंवा बिहार पोलिसांना तपास देण्यास अडचण काय आहे ?असा प्रश्न भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.आत्महत्येच्या कारणांचा शोध लवकर लागणे आवश्यक असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सहकार्याची भूमिका घेत नसल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपुत यांच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नव्या गोष्टी समोर येत असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी होऊ लागली आहे.भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे वाढीव वीज बिलाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यासाठी ठाण्याच्या खोपट येथील भाजप कार्यालयात आज आले होते त्यावेळी सोमय्या यांनीही सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआय किंवा बिहार पोलिसांकडे द्यावा अशी मागणी केली आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही गृहमंत्री अनिल देशमुख भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती.मात्र अनिल देशमुख यांनी सीबीआय चौकशीला स्पष्ट नकार दिला आहे.दुसरीकडे ठाण्यात आलेल्या किरीट सोमय्या यांनी सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात सहकार्य करत नसल्याचा स्पष्ट आरोप केल्याने आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार