शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

वेतनश्रेणी, निवृत्तीवेतनासाठी बालवाडी शिक्षिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:38 AM

पोलिसांची मध्यस्थी; बेमुदत उपोषण तूर्तास स्थगित, सोमवारी आयुक्तांसमवेत होणार बैठक

कल्याण : वेतनश्रेणी व निवृत्तीवेतन लागू करावे, या मागण्यांसाठी केडीएमसीच्या बालवाडी शिक्षिकांनी गुरुवारी महाराष्ट्र हुतात्मा दिनाचे औचित्य साधत पश्चिमेतील शिवाजी चौकात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. वरिष्ठ नागरिक परिसंघ, ठाणे जिल्हा संलग्न भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले. मात्र, आंदोलनापूर्वी आयुक्त गोविंद बोडके यांनी सोमवारी चर्चेसाठी यावे, असे पत्र संघटनेला दिले होते. परंतु, आयुक्तांकडून आमची केवळ फसवणूकच सुरू आहे, असा आरोप करीत शिक्षिकांनी उपोषण सुरूच ठेवले होते. अखेर, बाजारपेठ पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. आता सोमवारी आयुक्तांकडे होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.केडीएमसीत सध्या ६८ बालवाडी शिक्षिका असून, त्यांना आठ हजार रुपये मानधन मिळते. तर, ४८ शिक्षिका निवृत्त झाल्या असून, त्यांना कोणत्याही प्रकारे निवृत्तीवेतन मिळत नाही. २५ सप्टेंबर १९९६ ला ९५० ते १७५० रुपये, असा वेतनश्रेणीचा प्रस्ताव मंजूर झाला असतानाही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या प्रमुख मागणीसह निवृत्तीवेतन लागू करावे, अशी मागणी बालवाडी शिक्षिकांची आहे.शिक्षिकांनी याआधी ८ मार्चला उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता. परंतु, प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषणाचा निर्णय स्थगित करण्यात आला. त्यावेळी बालवाडी शिक्षिकांना बोडके यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, त्यांना मंत्रालयात बैठकीला जावे लागल्याने शिक्षिकांच्या मागण्या प्रलंबितच राहिल्या. कोणतीच कार्यवाही होत नसल्याने शिक्षिकांच्या वतीने १७ सप्टेंबर २०१९ ला भरपावसात आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याची दखल महापालिकेने घेतलेली नव्हती. त्यामुळे मागण्यांसाठी गुरुवारी पुन्हा हुतात्मा दिनाचे औचित्य साधत बेमुदत उपोषणाला त्यांनी प्रारंभ केला. तत्पूर्वी, आयुक्तांकडून सोमवारी चर्चा करू, असे पत्र आंदोलनकर्त्यांना पाठविण्यात आले होते. परंतु, हे पत्र धुडकावून लावत शिक्षिकांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला. यातील बहुतांश शिक्षिका या ६० वर्षे व ६५ वयोगटांतील असल्याने त्यांची प्रकृती उपोषणामुळे बिघडण्याची शक्यता लक्षात घेता बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी महापालिकेचे उपायुक्त मिलिंद धाट यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु, आम्ही त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत. त्यांना चर्चेसाठीही बोलावले आहे. मात्र, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवल्याचे धाट यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर पोलीस अधिकाºयांनी आयुक्त बोडके यांचीही भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली.आयुक्तांनीही शिक्षिकांना सोमवारी चर्चेसाठी बोलावल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास नकार दिला. अखेर, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर सायंकाळी आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. सोमवारच्या चर्चेचे पत्र आंदोलनकर्त्या शिक्षिकांकडून स्वीकारण्यात आले....तर दालनातच ठिय्या मांडूदरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बेमुदत उपोषण तूर्तास मागे घेऊन सोमवारी आयुक्तांबरोबर चर्चा करण्याचा निर्णय शिक्षिकांनी घेतला आहे. जर सोमवारी चर्चा नाही झाली आणि न्याय नाही मिळाला, तर आयुक्तांच्या दालनातच ठिय्या मांडणार, असा पवित्रा शिक्षिकांनी घेतला आहे.