भिवंडी: अंडे खाण्याच्या बहाण्याने नेलेल्या तीन वर्षाच्या मुलीला परत घरी न सोडता परस्पर दुसरीकडे नेणाऱ्या अपहरण कर्त्यास पोलीसांनी बदलापूर येथुन अटक केल्याची घटना काल बुधवारी रात्री दरम्यान घडली आहे.सदरची घटना जुन्या कौटूंबीक भांडणातून घडल्याचे समोर आले असून पोलीसांनी आरोपीस अटक करून मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.शहरातील देवूनगर येथील मोहम्मद अली कंपाऊण्ड येथे रहाणा-या मोह.इर्शाद मो. इद्रीस अन्सारी याची तीन वर्षाची मुलगी आलीया हिला काल बुधवार रात्री ९ वाजताच्या सुमारास अंडे खाण्यास घेऊन जातो,असे सांगून घेऊन गेलेला अब्दुल कलाम अजीज चौधरी हा मुलीला घरी परत घेऊन न आल्याने मुलीच्या वडीलांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. अखेर त्याचा तपास न लागल्याने मो. इर्शाद याने रात्री सव्वा एक वाजता भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या बाबत पोलीसांनी सर्वत्र शोध सुरू केला असता अपहरण कर्त्याच्या मोबाईलचे लोकेशन बदलापूर येथील वालवली गावात दिसून आले.पोलीसांनी सर्व पथके मिळून सापळा लावला आणि आरोपी अब्दुल कलाम यास तीन वर्षाच्या आलीयासह ताब्यात घेतले. अब्दुल कलाम अजीज चौधरी यांस आज दुपारी पोलीसांनी भिवंडी कोर्टात हजर केले असता त्यास कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कल्याणराव करपे यांनी दिली.सदर आरोपी अब्दुल अजीज चौधरी हा मजुरी काम करणारा असून तो व्यसनाधीन झाल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेली. ती अब्दुल अजीज याचा नात्याने भाऊ असलेल्या मोहम्मद इर्शाद मो.ईद्रीस अन्सारी या सोबत राहू लागली. त्यामुळे आपली पत्नी परत मिळावी,या उद्देशाने आरोपीने मोहम्मद इर्शाद अन्सारी याच्या तीन वर्षीच्या आलीयाचे अपहरण करून मुलीच्या बदल्यात आपल्या पत्नीची मागणी केली,अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे .
कौटूंबीक भांडणांतून तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:51 IST
भिवंडी : अंडे खाण्याच्या बहाण्याने नेलेल्या तीन वर्षाच्या मुलीला परत घरी न सोडता परस्पर दुसरीकडे नेणाऱ्या अपहरण कर्त्यास पोलीसांनी ...
कौटूंबीक भांडणांतून तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण
ठळक मुद्देअंडे खाण्याच्या बहाण्याने नेलेल्या मुलीचे परस्पर अपहरण भिवंडीतून अपहरण करणा-यास बदलापूरमध्ये अटकपोलीसांनी मुलीला दिले पालकांच्या ताब्यात