शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

सात वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा डाव नागरिकांच्या सर्तकतेमुळे फसला, अपहरणकर्त्याला दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:37 IST

शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरात सात वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत असताना वडिलांच्या नजरचुकीने एका व्यक्तीने मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सर्तकतेमुळे त्याचा अपहरणाचा प्रयत्न फसला.

कल्याण, दि. 11 - शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरात सात वर्षाची मुलगी तिच्या वडिलांसोबत असताना वडिलांच्या नजरचुकीने एका व्यक्तीने मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सर्तकतेमुळे त्याचा अपहरणाचा प्रयत्न फसला. नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणकर्त्याला अटक केली आहे. अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     राधानगरी सोसायटीत राहणारे सतीश पोखरकर हे नोकरी करतात. ते रात्री साडे नऊ वाजता हातगाडीवर सॅण्डविच खाण्यासाठी साई चौकात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची सात वर्षाची मुलगी हिला सोबत नेले होते. ते सॅण्डवीच खात असताना एका तरुणाने त्यांच्या नजरचुकीने मुलीला उचलून घेतले. तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न नागरिकांच्या लक्षात आला. नागरीकांनी त्याला पकडून त्यांच्या तावडीतून मुलीची सुटका करीत त्याला चांगलाच चोप दिला. अपहरण करणा:या तरुणाचे नाव नवरंगलाल सुजनकुमार कूमावत असे आहे. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने अंमली पदार्थाचे भरपूर सेवन केले असल्याने त्याची नशा आज सकाळ पर्यंत उतरलेली नाही. त्यामुळे त्याची पुढील चौकशी पोलिसांना करता आलेली नाही. त्याची नशा उतरल्यावरच त्याची पुढील चौकशी केली जाईल. कल्याण स्टेशन व ओसाड परिसरात गदरुल्ले फिरत असतात. त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही. चरस, गांजा, गर्द आणि मेडिकलमधून मिळणारी नशेची औषधे घेऊन टोळकी फिरतात. त्यांच्या विरोधात पोलिसांची कारवाई होत नसल्याने या नशाबाजांकडून मुले पळवून ती भिकेला लावणारी टोळी शहरात सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईतील लहानगा रघू शिंदे या मुलाला पळवून नेणारा तरुण सीसीटीव्ही कैद झाला होता. तो देखील नशा करुनच होता. रघू शिंदे हा मुलगा परत त्यांच्या पालकाना मिळाला आहे. त्याचप्रमाणे पोखरकर यांची मुलीचे अपहरण होण्यापासून वाचले आहे. अपहरणाचा प्रयत्न झाल्याने मुलीला मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा