शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून अपहरण झालेल्या बाळाची नाशिक येथून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:18 IST

दोन महिन्यांच्या बाळाचे (मुलाचे) अपहरण करणाऱ्या नीलम बोरा (३४, रा. नाशिक) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली.

ठाणे : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वेस्थानकातून दोन महिन्यांच्या बाळाचे (मुलाचे) अपहरण करणाऱ्या नीलम बोरा (३४, रा. नाशिक) या महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने रविवारी दुपारी अटक केली. तिच्या तावडीतून या बाळाची सुखरूप सुटका केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सोमवारी दिली.मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातून सलमान खान या १० महिन्यांच्या बाळाचे ३ फेब्रुवारी २०१९ रोजी अपहरण झाले होते. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मुंब्रा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे पथक या अपहरणाचा तपास करत असताना मुंब्रा ते सीएसटी आणि सीएसटी ते कसारा तसेच कर्जतपर्यंतच्या सर्व सीसीटीव्हींची पडताळणी केली.मार्च महिन्याच्या अखेरीस सीएसटी येथून दोन महिन्यांच्या बाळाला उचलून नेणारी एक महिला सीसीटीव्हीत कैद झाल्याचे ठाणे पोलिसांच्या निदर्शनास आले. सलमानच्या तपासालाही यातूनच वेग मिळाला. सलमानला उचलून नेणाºया महिलेची देहयष्टी सीएसटीमधून बाळ चोरणाºया महिलेशी मिळतीजुळती होती. त्यामुळेच ती आणि मुंब्रा येथून सलमानचे अपहरण करणारी महिला एकच असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाला या महिलेचे सीसीटीव्हीतील छायाचित्र मिळाले. हेच छायाचित्र वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध करू तिची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले. तसेच दादर ते आसनगाव, कल्याण ते कर्जतपर्यंत सुमारे २०० हून अधिक सीसीटीव्हींचीही पडताळणी करून तिचा कसून शोध घेण्यात आला. या प्रकरणाचा शोध सुरू असताना संबंधित संशयित महिला रामवाडी, पंचवटी भागातील असल्याचे समोर आले. या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने १४ एप्रिल रोजी दुपारी २ वा.च्या सुमारास नाशिकमधील पंचवटीतील रामवाडी येथील श्रद्धा पार्क येथून नीलम बोरा हिला ताब्यात घेतले. तिच्याच ताब्यातून मुंबईतून अपहरण झालेल्या दोन महिन्यांच्या बाळाचीही सुखरूप सुटका केली. बोरा हिने २९ मार्च २०१९ रोजी या बाळाचे सीएसटी येथून अपहरण केल्याचे सांगून लग्नाला १० वर्षे उलटूनही अपत्य नसल्याने या बाळाची चोरी केल्याची कबुलीही तिने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळ सुखरूप असून त्याला सोमवारी देवराज यांनी आईच्या ताब्यात दिले. तर, अपहरण करणाºया बोरा हिला पुढील कारवाईसाठी सीएसटी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.>एका मुलाचा शोध सुरूचकोपरी येथून एका कचरा वेचणाºया महिलेच्या दीडवर्षीय मुलीचे अपहरण करणाºया महिलेस कोपरी पोलिसांनी तीन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. तर, ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंब्रा रेल्वेस्थानकाच्या समोरून १० महिन्यांच्या सलमान खान या मुलाचे महिलेने अपहरण केले होते. या मुलाच्या अपहरण प्रकरणाच्या तपासातून या दोन महिन्यांच्या बाळाचा शोध लागला. मात्र, मुंब्य्रातील मुलाचा अद्यापही शोध लागला नसल्याने हा तपास अद्यापही सुरू आहे.