शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडिया स्पर्धा : कल्याणच्या सौम्याला सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 01:37 IST

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळप्रकारात ठाण्यातील कल्याण येथील खेळाडू सौम्याने १७ वर्षांखालील गटात ४० किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली.

ठाणे : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात कल्याणच्या सौम्या दळवी हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत राष्ट्रीय विक्र मासह सुवर्णपदक मिळवत ठाणे जिल्ह्याचे नाव उंचावले. या स्पर्धेत तिने आपलाच गतवर्षाचा विक्रम मोडीत काढला.गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळप्रकारात ठाण्यातील कल्याण येथील खेळाडू सौम्याने १७ वर्षांखालील गटात ४० किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली. तिने गतवर्षी नोंदवलेला एकूण ११२ किलो हा राष्ट्रीय विक्र म मोडताना ११३ किलो वजन उचलून नवा विक्रम केला. हा विक्रम क्षणभंगूर ठरवताना तिची सहकारी आरती तातगुंटी हिने ११५ किलो वजन उचलून विक्रमाला गवसणी घातली. मात्र, शेवटच्या प्रयत्नात सौम्याने ११६ किलो वजन उचलून नव्या राष्ट्रीय विक्र माला गवसणी घातली आहे. तिने गतवेळी खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. तसेच तिने राष्ट्रकुल युवा स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली होती. सौम्याचे वडील सुनील हे शिवछत्रपती पुरस्कारविजेते वेटलिफ्टर असून त्यांच्या तसेच अनिल माहुली, मधुसूदन देशपांडे आणि रिक्र ीएशन व्यायामशाळा, कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा सराव सुरू आहे. ती कल्याण येथील होली क्रॉसमध्ये शिकत असून तिची आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019kalyanकल्याण