शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रहिवाशांच्या दुर्लक्षामुळेच खत्रीची दुर्घटना: पालिकेने इमारत केली सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 00:56 IST

राबोडी येथील खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देऊन तसेच इमारत धोकादायक घोषित करूनही रहिवाशांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवाने रविवारची दुर्घटना घडल्याचा आरोप ठाणे महापालिकेने केला आहे.

ठळक मुद्देइमारत झाली होती अतिधोकदायक तरीही स्ट्रक्चरल आॅडीटच्या अहवालानुसार दुरुस्तीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राबोडी येथील खत्री अपार्टमेंटमधील रहिवाशांना वारंवार सूचना देऊन तसेच इमारत धोकादायक घोषित करूनही रहिवाशांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्दैवाने रविवारची दुर्घटना घडल्याचा आरोप ठाणे महापालिकेने केला आहे. विशेष म्हणजे स्ट्रक्चरल आॅडीटमध्येही दर्शविल्याप्रमाणे सी विंगने दुरुस्ती न केल्यामुळे रहिवाशांना या दुर्घटनेला सामोरे जावे लागले आहे.खत्री इमारत धोकादायक म्हणून २०१८ मध्येच ठाणे महापालिकेने घोषित केली होती. त्यामुळेच या इमारतीमधील रहिवाशांना स्ट्रक्चरल आॅडीट करण्याच्या तसेच त्यानुसार इमारतीमध्ये दुरुस्ती करण्याच्याही सूचना वारंवार नोटीसा बजावून दिल्या गेल्या होत्या. या इमारतीच्या ए आणि बी विंगमधील रहिवाशांनी स्ट्रक्चरल आॅडीटनुसार इमारतीमध्ये दुरुस्तीही केली होती. सी विंगच्या रहिवाशांनी मात्र स्ट्रक्रचरल आॅडीटकडे आणि महापालिकेने इमारत रिक्त करण्याच्या नोटीसीकडेही दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे इमारतदुरु स्तीची नोटीस बजावून त्याचे स्मरणपत्रही वारंवार देण्यात आले. तरीही रहिवाशांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यानेच दुर्दैवाने ही घटना घडल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.घटनेनंतर तात्काळ ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार, उप आयुक्त अशोक बुरपुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी पथकाच्या माध्यमातून याठिकाणी कायदेशीर कारवाई करीत इमारत पूर्णपणे रिक्त करुन सील केली.* या इमारतीची २०१३ मध्ये पाहणी करून ती महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम २६४ (१) (२) (३) (४) अन्वये धोकादायक इमारत म्हणून नोटिस बजावली होती. या नोटीसीमधील मुदतीनंतरही रहिवाशांनी ती रिक्त न केल्याने कलम २६८ (सी-१) अन्वये संबंधितांना नोटीस बजावली होती. त्यानंतरही ती रिक्त न केल्याने २६८ (५) अन्वये राबोडी पोलिसांकडेही ती इमारत रिक्त करुन देण्याबाबत पालिकेने पत्र दिले होते.* या इमारतीस ठाणे महापालिकेने पुरविलेल्या सर्व पाणी, विद्युत आणि ड्रेनेज सारख्या सेवा खंडित करण्याबाबत कार्यकारी अभियंत्यांनाही पत्र दिले होते. तसेच ही इमारत सी 2- बी अर्थात अतिधोकादायक या वर्गवारीत असल्याचा अहवाल महापालिकेच्या तालिकेवरील स्ट्रक्चरल आॅडिटर मे.सेंटरटेक यांनी दिलेला असून, त्यामध्ये ही इमारतीची तातडीने दुरु स्ती करण्याचे सूचविण्यात आले होते. इमारत तातडीने रिक्त करून दुरु स्त करावी. तसे न केल्यास दुर्घटनेस महापालिका जबाबदार राहणार नाही,अशीही नोटीस बजावली होती. इमारत पूर्ण रिकामी करु न काम न केल्यामुळेच या दुर्घटनेला रहिवाशांना सामोरे जावे लागले. या घटनेनंतर उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या पथकामार्फत सुरक्षिततेच्या दृष्टीने ही इमारत तात्काळ खाली करून सील केल्याचे पालिकेने म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र