शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचे केदार दिघेंविरुद्ध पैसे वाटल्याचा आरोप; अदखलपात्र गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 06:22 IST

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गोरीवले यांच्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी असलेल्या मोटारमध्ये दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे ठेवून ते मतदारांना वाटण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप आहे.

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक रिंगणात असलेले उद्धवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांच्याविरोधात दारूच्या बाटल्या आणि पैसे वाटल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी बुधवारी दिली. पोलिसांनी एका वाहनातून ५२ हजारांची रोकड जप्त केली आहे. केदार दिघे यांनी मात्र सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. 

शिंदेसेनेच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनुसार केदार दिघे, सचिन गोरीवले, प्रदीप शेडगे, रवींद्र शिनलकर यांच्यासह नऊ जण २० नोव्हेंबर, २०२४ रोजी पहाटे १. ४५ ते २ वाजण्याच्या सुमारास कोपरीतील अष्टविनायक चौकात आले होते. त्यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी गोरीवले यांच्या ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी असलेल्या मोटारमध्ये दारू आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे ठेवून ते मतदारांना वाटण्याच्या प्रयत्नात होते, असा आरोप आहे.

त्याच वेळी भोसले यांच्यासह शिंदेसेनेच्या उतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून कोपरी पोलिसांकडे तक्रार केली. भोसले यांच्या तक्रारीनंतर दिघे यांच्यासह नऊ जणांविरुद्ध  भारतीय न्याय संहिता कलम १७४ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोपरी पोलिसांनी एका वाहनातून मद्याच्या ११ बाटल्या आणि ५२ हजारांची रोकड असा ५४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रोकड आणि दारू असलेली मोटार ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. 

या मोटारीमध्ये शासनाच्या वाहनाला असलेला अंबर दिवा मिळाला आहे. गुन्हा दाखल झाला, त्यावेळी कोपरी पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सत्ताधारी घाबरले : दिघे 

सत्ताधारी घाबरले असून, माझी गाडी     मी स्वत:हून पोलिस स्टेशनला नेल्यानंतर तपासणी झाली. त्यामध्ये काहीही सापडले नाही. असे असताना जाणीवपूर्वक माझे नाव गुन्ह्यामध्ये समिविष्ट करून मला लक्ष्य केले जात आहे. कोपरी पाचपाखाडीत ज्यांनी पैशांचा महापूर आणला, जे साड्या वाटप करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. मात्र, माझी गाडी तपासतानाच्या व्हिडीओत गाडीमध्ये काही सापडले नाही, तरीही जाणीवपूर्वक मंगळवारी रात्रीच्या घटनेनंतर बुधवारी सकाळी गुन्हा दाखल होतो. यामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा हेतू आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024kopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडीEknath Shindeएकनाथ शिंदे