शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अग्निशमन नोटिशींना केराची टोपली, हॉटेल व्यावसायिकांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 6:28 AM

मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल, पब ना सहा महिन्यांत पुन्हा दुस-यांदा नोटिसा बजावल्या आहेत.

ठाणे : मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल, पब ना सहा महिन्यांत पुन्हा दुसºयांदा नोटिसा बजावल्या आहेत. यापूर्वीही एकाही हॉटेल अथवा पबचालकांनी कागदपत्रांची पूर्तता केली नव्हती. आतादेखील तिच परिस्थिती असून एकाही हॉटेलचालकाने ती केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता तरी पालिका त्यांच्या विरोधात कारवाईचे हत्यार उगारणार की आपली तलवार म्यान करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.शहरातील ज्या हॉटेल व्यावसायिंकाकडे फायरची एनओसी नसेल त्या सर्वांना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक कायदा, २००६ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ मधील तरतूदीनुसार ७१ तासांच्या अवधीची नोटिस बजावली आहे. परंतु, ७२ तास उलटून गेल्यानंतरही अग्निशमन दलामार्फत नोटिसा बजावण्याचे काम सुरूच आहे. बुधवार पर्यंत त्या बजावल्या जाणार असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले.मुबंईत कमला मिल येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने अग्नी सुरक्षा यंत्रणांची पूर्तता न करणाºया हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत कडक भूमिका अवलंबली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत एनओसी नसलेल्या हॉटेल, पब आणि तळघरातील हॉटेलचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर अग्निशमन विभागाने अशा हॉटेलना नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, तेव्हा या सर्वांकडून शून्य प्रतिसाद मिळाला होता. आता मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागामार्फत पुन्हा नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर आता ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत हॉटेलांना कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटिस बजावली असून आजही ती कारवाई सुरूच आहे.मात्र,महापालिकेच्या या आदेशाला हॉटेल मालकांनी गांभीर्याने घेतले नसून दोन दिवस उलटूनही एकाही हॉटेलचालकाने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.  

टॅग्स :hotelहॉटेलfireआग