शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीला १४ वर्षांनंतरही भरपाई मिळेना; २६ जुलैच्या महापुरात एक कोटी ८५ लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:38 IST

राज्य सरकारकडून मागण्या बेदखल

कल्याण : खर्च आणि उत्पन्नातील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटी उपक्रम डबघाईला आला असताना दुसरीकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सरकारदरबारी त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सेवा भरती नियमावली असो अथवा २६ जुलै २००५ च्या महापुरात उपक्रमाच्या झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा असो, याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने केडीएमटीची स्थिती दिवसागणिक अधिकच बिकट बनली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा २३ मे १९९९ ला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या काळात परिवहनच्या ताफ्यात ४० बस होत्या. त्यात टप्याटप्प्याने वाढ होऊन आजमितीला २१८ बस उपक्रमाच्या ताफ्यात आहेत. यात २०१५ पूर्वीच्या १०० बस आणि केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत दाखल झालेल्या ११८ बसचा समावेश आहे. दरम्यान जुलै २००५ च्या महापुरात उपक्रमाच्या ताफ्यातील ८८ बसचे नुकसान झाले. तेव्हापासून उपक्रमाला जी घरघर लागली ती आजतागायत कायम आहे.

एकीकडे वाहक आणि चालकांची कमतरता, खर्च आणि उत्पन्नातील वाढती तफावर ही केडीएमटीच्या आर्थिक डबघाईची कारणे असलीतरी दुसरीकडे सरकारदरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत न झालेली कार्यवाही देखील या उपक्रमाच्या अधोगतीला कारणीभूत ठरली आहे. २६ व २७ जुलै २००५ ला आलेल्या महापुरात केडीएमटीचा गणेशघाट आगार पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. यात आगारातील बसगाड्यांसह तेथील मालमत्तेचे एक कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले होते. याबाबत राज्य सरकारकडे सविस्तर प्रस्ताव पाठवून पूरपरिस्थितीने नुकसान झालेल्या उपक्रमास आर्थिक सहाय्य मिळण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. आज या महापुराच्या घटनेला १४ वर्षे उलटूनही भरपाई उपक्रमाला मिळालेली नाही. यंदाच्या पूरपरिस्थितीत आगारातील ३५ बसचे नुकसान झाले आहे. परंतु, आताही विम्यावरच उपक्रमाची मदार राहणार आहे.

केडीएमटीच्या बसमधून कर्तव्यार्थ विनामूल्य प्रवास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चापोटी पोलीस अनुदानापोटीची थकीत रक्कम मिळालेली नाही. याबाबतही सरकारक डे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. २०१८-१९ आणि २०१९-२० वर्षातील ७० ते ८० लाखांचे अनुदान उपक्रमाला मिळणे बाकी आहे. जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत १८५ बस केडीएमटीला मंजूर झाल्या होत्या. परंतु, आर्थिक परिस्थितीचा आढावा घेता उपक्रमाने यातील ११८ बस खरेदीची तयारी दर्शवली. त्याप्रमाणे ताफ्यात बस दाखल झाल्या.

परंतु, सरकारचा शेवटचा हिस्सा तीन कोटी ६२ लाख रुपये आणि केडीएमसीचा द्यावयाचा हिस्सा पाहता एकूण सात कोटी ३५ लाख रुपये केडीएमटीला मिळणे बाकी आहे. परंतु, ते अद्याप मिळालेले नाही. परिणामी बस पुरविणाºया कंत्राट कंपनीचे थकीत वेतन दिले गेलेले नाही. या संदर्भातही केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला गेला आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद उपक्रमाला मिळालेला नाही.कंत्राटी चालक, वाहकांच्या प्रस्तावरही कार्यवाही नाही

उपक्रमातील कंत्राटी चालक आणि वाहकांच्या मागणीनुसार त्यांना स्थायी व अस्थायी पदावर सामावून घेण्याबाबत सरकारकडे पद मंजुरीबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, त्याबाबतही अद्याप कार्यवाही झालेली नाही. प्रवासी कर आणि बालपोषण अधिकरात सूट व सवलत मिळण्याबाबत सरकारी स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची बाब उपक्रमाने सविस्तर माहिती अहवालामार्फत शुक्रवारी होणाºया परिवहन समितीच्या सभेच्या पटलावर मांडली आहे. याबाबत सर्वपक्षीय सदस्यांकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली