शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

भाडेवाढीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत केडीएमटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 01:02 IST

उत्पन्न आणि खर्च, यामधील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटीचा उपक्रम डबघाईला आला आहे.

कल्याण : उत्पन्न आणि खर्च, यामधील वाढत्या तफावतीमुळे केडीएमटीचा उपक्रम डबघाईला आला आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१८ मध्ये परिवहन समिती तसेच महासभेने मंजूर केलेला भाडेदरवाढीचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे (एमएमआरटीए) मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही.पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी एक रुपया आणि त्याच्या पुढील प्रतिकिलो मीटरसाठी दोन रुपये अशी भाडेवाढ प्रस्तावित होती. मे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. परंतु, पाच महिने हा प्रस्ताव मंजुरीविना धूळखात पडला आहे.एमएमआरटीए परिक्षेत्रात सद्य:स्थितीला मुंबईतील बेस्ट, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आदी महापालिकांची परिवहनसेवा सुरू आहे. या उपक्रमाच्या भाडेदर निश्चितीला एमएमआरटीएकडून अंतिम मान्यता मिळते. दरम्यान, इंधनदरवाढ आणि भाडेदरात सुसूत्रता आणण्याचे कारण देत केडीएमटी व्यवस्थापनाने सप्टेंबर २०१८ मध्ये चार टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन समितीच्या सभेत दाखल केला होता. त्याला मान्यताही मिळाली. मात्र, एमएमआरटीएने त्याला हिरवा कंदील न दाखवल्याने अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दिवसाला साडेतीन हजार लीटर डिझेल उपक्रमाला बसगाड्यांसाठी लागते. त्यात मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यात प्रचंड तफावत असल्याने याचा फटका उपक्रमाला बसला आहे. उपक्रमाची आर्थिक स्थिती पुरती डबघाईला आल्याचे चित्र आहे.केडीएमटीचे खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावाला मिळत नसलेला प्रतिसाद आणि नुकत्याच आलेल्या महापुराने गणेशघाट आगाराचे पावणेदोन कोटींचे केलेले नुकसान यामुळे उपक्रमाची आर्थिक स्थिती अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१८ मध्ये मंजूर केलेल्या भाडेदरवाढीचा प्रस्तावाला मान्यता मिळावी, जेणेकरून काहीसे उत्पन्न वाढून उपक्रमासाठी हिताचे ठरेल, अशी भावना व्यवस्थापन आणि सदस्यांची आहे.२०१६ मध्ये निर्माण झालेल्या सुट्या नाण्यांच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाडेदर ५, १०, १५, २० असे पैसे टप्प्यांत आकारले जाऊ लागले. परंतु, तेव्हापासून भाडेवाढ केलेली नव्हती. परंतु, त्यानंतर भाडेदरात सुसूत्रता आणण्यासाठी एक रुपयाची वाढ करण्यात आली. पण, ती मंजुरीअभावी अद्याप कागदावरच राहिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्या भाडेवाढीला मान्यता मिळावी. त्यामुळे होणारी परवड काहीशी कमी होईल, याकडे लक्ष वेधले जात आहे.असा आहे भाडेवाढीचा प्रस्तावपहिल्या टप्प्यासाठी म्हणजे दोन किमीला सध्या पाच रुपये भाडे आकारले जात आहे. त्यात एक रुपयाची वाढ सुचवली आहे. त्यामुळे प्रस्तावाला एमएमआरटीएकडून मान्यता मिळाली, तर पहिल्या टप्प्यासाठी सहा रुपये आकारले जातील, तसेच पुढील टप्प्यासाठी दोन रुपये आकारण्यात येतील.या भाडेदरवाढीमुळे उपक्रमाचे उत्पन्न दिवसाला ५० हजाराने वाढेल, तर मासिक उत्पन्नात १५ ते २० लाख रुपयांची वाढ होईल, असा दावा केला जात आहे.बेस्टने त्यांचे दर कमी केले असले तरी मुंबई महापालिकेडून त्या उपक्रमाला दिवसाला एक कोटी ६५ लाखांचे अनुदान मिळत आहे. परंतु, केडीएमटीची तशी परिस्थिती नाही, याकडेही लक्ष वेधले जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका