शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीची भाडेवाढीस मंजुरी; किमान अंतरासाठी एक रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:56 IST

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने चार टक्के भाडेवाढ करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे. महासभेने त्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही भाडेवाढ अमलात येणार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने चार टक्के भाडेवाढ करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे. महासभेने त्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही भाडेवाढ अमलात येणार आहे.परिवहनचे प्रवासी भाडे किमान दोन किलोमीटरच्या अंतरासाठी पाच रुपये होते. त्यात एक रुपया वाढ प्रस्तावित असल्याने आता सहा रुपये मोजावे लागणार आहेत. परिवहन उपक्रमाने व समितीने भाडेवाढ प्रस्तावित करताना नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि मीरा-भार्इंदर महापालिकेतील परिवहन उपक्रमातील प्रवासीभाडे किती आहे, याचा विचार केला. बसनंतर प्रवासी सगळ्यात जास्त रिक्षाने प्रवास करतात. केडीएमसी हद्दीत मोठ्या प्रमाणावर शेअर रिक्षा धावत असल्याने त्यांचेही भाडे विचारात घेण्यात आले. शेअर रिक्षाचालक एका किलोमीटरच्या पेक्षा कमी अंतराला किमान १० रुपये घेतात. परिवहनची चार टक्के भाडेवाढ मान्य झाली तरी दोन किलोमीटरसाठी प्रवाशाला सहा रुपये मोजावा लागणार आहे. रिक्षाच्या तुलनेत परिवहनचा प्रवास स्वस्तच राहणार आहे.कमी अंतरासाठी एक रुपया भाडेवाढ प्रस्तावित असली, तरी भिवंडी व वाशी या लांबपल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी भाड्यात पाच रुपयांनी वाढणार आहे. १६ किलोमीटरसाठी २० रुपये घेतले जात होते. आता भाडेवाढीमुळे प्रवाशाला २५ रुपये मोजावा लागणार आहेत. १० किलोमीटरच्या प्रवासी भाड्यासाठी सार्वजनिक उपक्रम जो दर आकारतात, त्याचा विचार करून ही भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे.परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात तूट आहे; परंतु केडीएमसी अर्थसंकल्पात तरतूद केलेली पूर्ण रक्कम परिवहन उपक्रमाला देत नाही. महसुली खर्चासाठी महापालिकेकडून कमी निधी दिला जातो. परिवहन उपक्रम आधीच आर्थिक संकटात आहे. उपक्रमाला त्यातून बाहेर काढण्यासाठी चार टक्के भाडेवाढ फायदेशीर ठरणार नाही.५५ टक्के खर्च केवळ डिझेलवरडिझेलची दरवाढ झाल्याने परिवहनने ३० टक्के भाडेवाढ करणे अपेक्षित होते. मात्र, ही भाडेवाढ प्रवाशांवर बोजा टाकणारी ठरली असती.इंधन दरवाढीच्या तुलनेत भाडेवाढ न करता, केवळ चार टक्के भाडेवाढ केली आहे. परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नापैकी ५५ टक्के खर्च हा केवळ डिझेलवर होतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण