शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पोहोच रस्त्यासाठी केडीएमसीचे श्राद्ध, चार जणांचे मुंडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:52 IST

शहराच्या पूर्व भागातील मातृछाया सोसायटीला पोहोच रस्ता नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहे.

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील मातृछाया सोसायटीला पोहोच रस्ता नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहे. या रस्त्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या (आप) नेतृत्वाखाली सोसायटीतील रहिवाशांनी २१ मे पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. केडीएमसी प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या चार जणांनी मुंडण करून महापालिकेच्या नाकर्तेपणाचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला.गौतम कांबळे, अजित कर्पे, मुकुंद कांबळे आणि गणेश खाकम यांनी मुंडण केले. तसेच त्यांच्या हस्ते महापालिकेचे श्राद्ध घालण्यात आले. याप्रसंगी आपचे पदाधिकारी धनंजय जोगदंड उपस्थित होते. २१ मे पासून ‘ड’ प्रभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र, या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त रहिवाशांनी केडीएमसी ‘अमर रहे’च्या घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. मातृछाया सोसायटीकडे जाणारा पोहोच रस्ता अर्धवट तयार केला आहे. हे काम पुन्हा सुरू करण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.यासंदर्भात विविध पक्षाचे राजकीय लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे साखळी उपोषण सुरू केले आहे. मुंडण व श्राद्ध आंदोलनानंतरही जाग आली नाही तर राज्यपालांकडे दाद मागून बेमुदत उपोषण केले जाणार असून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.>नगरसेवक, आमदारांची भेटदरम्यान, उपोषणकर्त्यांची मंगळवारी शिवसेनेचे नगरसेवक निलेश शिंदे यांच्यासह प्रशांत काळे यांनी भेट घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांची बाजू ऐकून घेतली.