शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

केडीएमसीची करवाढ टळली

By admin | Updated: February 15, 2017 04:33 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत अग्निशमन करात दीड टक्का आणि पाणीपुरवठा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत अग्निशमन करात दीड टक्का आणि पाणीपुरवठा दरात वाढ करण्याचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. मात्र, कोणतीही कर वाढ करणार नाही, असे स्पष्टीकरण स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी मंगळवारी दिले. केडीएमसीमध्ये मालमत्ता कर सर्वाधिक असताना पुन्हा नव्याने करवाढ करून करदात्यांच्या माथी भुर्दंड मारणार नाही, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली आहे. असे असले तरी या मागे ठाणे, उल्हासनगर व मुंबई महापालिका निवडणुकांचे सावट असल्याची चर्चा आहे.सध्या केडीएमसीच्या योजनेमार्फत सरासरी ३१० दशलक्ष लीटर तर २७ गावांसाठी एमआयडीसीकडून ३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा प्रतिदिन केला जातो. केडीएमसीला प्रतिदिन उल्हास नदीतून २३४ दशलक्ष लीटर पाणी कोटा मंजूर आहे. बारावे आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्राव्यतिरिक्त जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत मोहिली येथे १०० दशलक्ष लीटर व नेतिवली येथे १५० दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्र बांधून कार्यान्वित करण्यात आली आहेत. सध्या ४०० दशलक्ष लीटर पाणी शुद्ध करण्याची क्षमता महापालिकेकडे आहे. परंतु, आस्थापना खर्च, विद्युत देयके, देखभाल-दुरुस्तीचा खर्च, रसायनांचा खर्च, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चात दरवर्षी होणारी वाढ, त्यात महापालिकेने जेएनएनयुआरएम योजनेसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे.महापालिकेने यापूर्वी एप्रिल २०१६ मध्ये दरवाढ केली होती. ही वाढ फक्त वाणिज्य वापरासाठीच केली होती. मात्र, पाण्याची नागरिकांची वाढती गरज व यासाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करता पाणीपुरवठा तोट्यात चालवणे आर्थिकदृष्ट्या धोक्याचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या दरात वाढ करणे आवश्यक आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. २७ गावांचा विस्तार लक्षात घेता तेथे मुख्य जलवाहिन्या टाकणे, वितरण वाहिन्या टाकणे, यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांसाठी ३३ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे, असेही प्रस्तावात म्हटले आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ नसल्याचे सांगितले जात असताना अग्निशमन दल सक्षमीकरणाचे कारण पुढे करीत दीड टक्क्यांनी करात वाढ करण्याचा प्रस्ताव बुधवारच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, ही करवाढ न करण्याचा निर्णय स्थायी समिती घेणार आहे.पाणी गळती, पाणी चोरी रोखण्यास प्रशासन अपयशी ठरले असताना करदरवाढ नागरिकांच्या माथी कशाला मारता? असा सूरही स्थायी समितीचा आहे. नवनिर्वाचित सभापती रमेश म्हात्रे यांची बुधवारची पहिलीच सभा आहे. त्यामुळे ते यासंदर्भात काय निर्णय घेतात? याकडे कल्याण-डोंबिवलीचे लक्ष लागले होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी त्यांनी कोणतीही कर दरवाढ करणार नाही, असे सांगून तूर्तास करदात्यांना दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)