शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

केडीएमसीची पहिली ई-लर्निंग शाळा

By admin | Updated: August 15, 2015 23:13 IST

संगणकाच्या अभावात एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये संगणकीय ज्ञान दुरापास्त झाले असताना मोहने येथील शांताराम महादू पाटील ही शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे.

- प्रशांत माने,  कल्याण संगणकाच्या अभावात एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये संगणकीय ज्ञान दुरापास्त झाले असताना मोहने येथील शांताराम महादू पाटील ही शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे. संगणकीय कक्षाबरोबरच ई-लर्निंग शाळा या ठिकाणी सुरू केली असून असा उपक्रम राबविणारी महापालिकेची ही पहिलीच शाळा आहे. असे असले तरी समूह साधन केंद्र असलेल्या या शाळेला घटत्या पटसंख्येचे ग्रहण लागले असून आजूबाजूच्या खाजगी शाळांच्या वाढत्या पसाऱ्याचा हा परिणाम आहे.मराठी माध्यमाची ही शाळा असून या समूह साधन केंद्राच्या अखत्यारीत ५ शाळा येतात. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण या ठिकाणी दिले जाते. सद्य:स्थितीला शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १६० इतकी आहे. शाळाशाळांमध्ये १ किमीचे अंतर बंधनकारक असताना हा नियम या ठिकाणीही पायदळी तुडविला गेल्याचे दिसते. परिसरात ४ ते ५ खाजगी शाळा असल्याने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम झाल्याचे दिसते. शाळेची वास्तू दुमजली आहे. या ठिकाणी आठ वर्गखोल्या असून यामध्ये पंखे, वीज आणि बेंचेस तसेच फळा आदी सुविधा पुरविल्या गेल्या आहेत. शाळेला भव्य मैदान लाभले असून मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र अशा प्रसाधनागृहाची सोयदेखील उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे ई-लर्निंगची सुविधा देणारी केडीएमसीची ही एकमेव शाळा आहे. महापालिकेतील स्वीकृत लोकप्रतिनिधींच्या निधीतून ही सुविधा लाभली आहे. तसेच इंटरनेटही देण्यात आले आहे. शाळेत संगणक विशेष कक्ष उघडला असून तेथील पाचही संगणक सुस्थितीत सुरू आहेत. दरम्यान, समूह साधन केंद्र असूनही सफाई आणि सुरक्षा कर्मचारी दिलेला नाही. या ठिकाणी मुख्याध्यापकांसह पाच शिक्षक कार्यरत असून आणखी एका शिक्षकाची आवश्यकता आहे. शालेय पोषण आहार नियमितपणे विद्यार्थ्यांना मिळत असून बहुतांश शैक्षणिक साहित्य उशिरा का होईना त्यांना मिळाले आहे. परंतु, गणवेश आणि बुटांना मुहूर्त मिळालेला नाही.