शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

केडीएमसीचा विकास भाजपाचीच जबाबदारी

By admin | Updated: November 11, 2015 00:01 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत यावेळेस नागरी समस्यांच्या चर्चेचा अभाव दिसून आला. सर्वपक्षीय नेते नागरी समस्यांऐवजी हेव्यादाव्याचे राजकारण करण्यात दंग होते. परिणामी नागरिक अधिक त्रस्त झाले. मतांची कमी टक्केवारी हे त्याचे निदर्शक आहे. आता नागरिकांना केवळ विकास हवा आहे. त्यामुळेच त्यांनी या निवडणुकीत शिवसेना किंवा भाजपाला संपूर्ण बहुमत दिलेले नाही. शिवसेनेच्या तुलनेने भाजपने निदान स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांवरच भर देणार असल्याचे सांगून आतापर्यंत ते झाले नसल्याचे कबूल केले. त्या तुलनेने शिवसेनेने मात्र त्यांनी जे गेल्या १५ वर्षात केलेच नाही ते दाखवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याची भावना नागरिकांमध्ये होती. शिवसेनेच्या होर्डीग्जमध्ये देखील एक मत बाळासाहेबांना ही कॅच लाईन टाकली होती. त्यामुळे अजूनही बाळासाहेबांच्या नावानेच मते का मागावी लागतात, भावनेशी खेळून काय मिळणार, असा सवाल डोंबिवलीकरांनी केला. परिणामी डोंबिवलीकरांनी त्यांच्या उमेदवारांना चांगलेच पाणी पाजले. कल्याणमध्येही शिवसेनेला म्हणावे तसे यश आलेले नाही. त्यांच्या विद्यमान महापौरांसह सभागृह नेते कैलास शिंदे यांनाही नागरिकांनी घरचा रस्ता दाखवला. निवडणुकीच्या गेल्या पंधरा-वीस दिवसात डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये कल्याणमधील शिवसैनिकांमधील हेवेदावे ज्या पद्धतीने चव्हाट्यावर आले होते, त्याचा समाचार शिवसैनिकांसह प्रसिद्धी माध्यमांनी घेतला होता. एकमेकांना शिवीगाळ करणे, खुर्च्या उचलून फेकण्यापर्यंत काहींची मजल गेली होती. तर काहींची हातापायी झाली होती. नागरिकांना अशा पद्धतीचे वातावरण नको आहे. सशक्त लोकशाहीसोबतच खेळीमेळीचे वातावरण अपेक्षित आहे. प्रचार काळात शिवीगाळ, दादागिरी, मारहाण याला ऊत आला. मनसेने नाशिकमध्ये त्यांनी जे दिवे लावले त्याचे गुणगान करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या येथील नगरसेवकांनी स्वत:च्या वॉर्डांसह परिसराची जी दैनावस्था केली होती, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. फेरीवाल्यापासून -(दाबेली वाल्या) व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांना वेठीस धरण्याची किंमत काही लोकप्रतिनिधींना मोजावी लागली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना तर स्वत:ला निवडणुकीत सिद्धही करता आले नाही. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत सातत्याने त्यांची पिछेहाट झाली आहे. विरोधकांची भूमिका करण्याची संधी असतानाही त्यामध्ये दोन्ही काँग्रेसला यश आले नाही. भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदीं बद्दलचा विश्वास, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मतदारांना आपल्या स्वच्छ चारित्र्याची घातलेली आर्त साद हे एकमेव कारण आहे. स्थानिक नेतृत्वामध्ये डोंबिवलीतील आमदार वगळता कल्याणमधील विशेषत: पश्चिमेतील आमदार आणि अन्य ठिकाणांहून आलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले. त्या २७ गावांमध्येही डोंबिवलीचाच ट्रेंड असल्याने तेथेही संघर्ष समितीच्या माध्यमातून भाजपला यश मिळाले. तेथील बहुतांशी नागरिक - चाकरमानी हा जीवनावश्यक वस्तूंसह दळणवळणासाठी डोंबिवलीवरच अवलंबून आहे. त्यामुळे या शहरासह येथील रहिवाशांची त्यांचे जिव्हाळयाचे संबंध आहेत.