शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नियम पाळा, अन्यथा पोलिस कारवाई; केडीएमसीचे शून्य कचरा मोहीम मिशन, २५ मे पासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 16:43 IST

ओला कचरा या प्रकारात फळे, भाज्या यांचे टाकाऊ भाग, शिल्लक राहिलेले अन्न आदिंचा समावेश होतो.

कल्याण:  केडीएमसीच्यावतीने २५ मे पासून शून्य कचरा मोहीम राबविण्यात येणार आहे. येथील पश्चिमेकडील नागरीकांची आधारवाडी डंपिंग ग्राउंडमुळे होणा-या त्रसातून सुटका करण्याच्या दृष्टीने ही मोहीम संपूर्ण महापालिका क्षेत्रत राबविली जाणार आहे. यात ओला आणि सूका कचरा एकत्रित उचलला जाणार नाही. कच-याचे वर्गीकरण बंधनकारक असून अन्यथा आवश्यकतेनुसार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील असे परिपत्रक आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यावतीने जारी करण्यात आले आहे.

ओला कचरा या प्रकारात फळे, भाज्या यांचे टाकाऊ भाग, शिल्लक राहिलेले अन्न आदिंचा समावेश होतो. हा कचरा स्वतंत्र डस्टबीनमध्ये ठेवून तो देण्यात यावा अथवा सोसायटीमध्ये स्वतंत्र स्विकारण्याची व्यवस्था असलेल्या डस्टबिनमध्ये टाकावा. ओला कचरा कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिक पिशव्यांमध्ये बांधला जाणार नाही अथवा त्यामध्ये प्लास्टिक, कागद व अन्य कच-याचे घटक राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, ओला कचरा दररोज उचलण्यात येईल. मात्र सूका कचरा बुधवार आणि रविवार या दिवशीच स्विकारण्यात येईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सुका कचरा या प्रकारात कागद , पुठ्ठा, प्लास्टिक, प्लास्टिक बाटली, प्लास्टिक डब्बे, कापड, चप्पलं, टायर, फíनचर, गादया, केस, काच, रबर, धातू, ई-वेस्ट(इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, बॅटरीज, बल्ब, टयूब, कॉम्युटर, टी.व्ही आदीचे टाकाऊ भाग.) व थर्माकोल, सिरॅमिक, फोम आदी प्रकारच्या कच-याचा समावेश होतो. परंतू यामध्ये प्लास्टिक व कागद या प्रकारा व्यतिरिक्त इतर प्रकारचा कचरा तुरळक प्रमाणात उपलब्ध होतो. त्यामुळे सुका कचरा घरामध्ये साठवून अथवा सोसायटीमध्ये वेगवेगळया गोणी अथवा डब्यामध्ये साठवून ठेऊन घंटागाडीमध्ये देण्याची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे.महापालिकामार्फत कचरा उचलण्यासाठी येणा-या घंटागाडयांची वेळ निश्चित करण्यात आलेली असून त्यानुसार आपल्या विभागामध्ये घंटागाडीचा क्र मांक वाहन चालक, मुकादम, सॅनिटरी इन्सपेक्टर यांचे मोबाईल क्र मांकाचे फलक दर्शनी भागामध्ये लावण्यात येणार आहेत.

तर गुन्हे दाखल होतील

कचरा वर्गीकरण करु न न देणा-या,प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणा-या विरोधात २५ मे नंतर महापालिकेमार्फत घनकचरा उपविधीनुसार कडक कारवाई करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे ही दाखल करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणेPoliceपोलिस