शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे विद्यार्थी गणवेशविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:38 IST

कार्यादेशाची प्रतीक्षा; शैक्षणिक वर्ष संपण्यास उरले अवघे दोन महिने

डोंबिवली : शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे दोन महिने शिल्लक असले, तरी केडीएमसीच्या ६० शाळांमधील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. शिक्षण मंडळ समितीचे सभापती विश्वदीप पवार यांच्या म्हणण्यानुसार, गणवेशाची एक कोटी ९६ हजार रुपयांची कार्यादेशाची फाइल आयुक्तांच्या सहीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, आमच्याकडे कोणतीही फाइल रखडलेली नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण मंडळ समितीचा भोंगळ कारभार पुन्हा उघड झाला आहे.एकीकडे महापालिका शाळांची पटसंख्या वाढीस लागावी, शाळांची इमारत, वर्गखोल्यांची दुरुस्ती व्हावी, मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता शैक्षणिक वर्ष संपायला अवघे दोन महिने राहिले असूनही त्यांना गणवेश मिळालेला नाही. पवार हे गणवेशासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु, प्रशासन त्यांच्या सूचनांकडे कानाडोळा करत आहे.याबाबत पवार म्हणाले, स्थायी समितीच्या बैठकीत गणवेशाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानंतर, एक कोटी ९६ हजार रुपयांची कार्यादेशाची फाइल मंजुरीसाठी आयुक्तांच्या दरबारी प्रलंबित आहे. यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके म्हणाले की, माझ्याकडे एकही फाइल प्रलंबित नाही. जी कामे करायची ती तत्काळ केली जातात. जर अन्य कोणाकडे ती फाइल असेल, तर याबाबतची माहिती घ्यावी लागेल. पण, विद्यार्थ्यांची गैरसोय मात्र होऊ दिली जाणार नाही.गणवेश व शालेय साहित्यखरेदीसाठी मे महिन्यातच नियोजन करायला हवे होते. अद्यापही काहीही हालचाल नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे या सर्वाला सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचे दिसून येते.- प्रकाश भोर्ईर, विरोधी पक्षनेतेमुलांना गणवेश आवश्यक असतात. तळागाळातील विद्यार्थी या शाळांमध्ये येत असतात. आयुक्त गोविंद बोडके हे सकारात्मक आणि संवेदनशील अधिकारी आहेत. ते नक्कीच यातून तोडगा काढतील. मुलांना लवकर गणवेश मिळावा, ही अपेक्षा.- वैजयंती घोलप, माजी सभापती, शिक्षण समिती

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका