शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या आरोग्य, धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर मंत्रालयात खल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 13:52 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील महापालिका रुग्णालयांना घरघर लागली आहे. येथील धोकादायक इमारतींच्या पुर्नबांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील महापालिका रुग्णालयांना घरघर लागली आहे. येथील धोकादायक इमारतींच्या पुर्नबांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकारी जागेवरील रहिवाश्यांचे नाव लावून कब्जा हक्क देणे आदी विषयांसंदर्भात, आरोग्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात सोमवारी बैठक घेतली. त्यापैकी आरोग्य विषयक समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश आयुक्त गोविंद बोडके यांना दिले.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टारच्या माध्यमातून महिनाभरापूर्वी महापालिका हद्दीतील विविध नागरि समस्यांबद्दल पालकमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेत त्यांनी बैठक घेतल्याची माहिती कॉम्रेड महेश साळुंखे यांनी दिली. ते म्हणाले की, शास्त्रीनगर व रुक्मिणीाई हॉस्पिटल यांना सिव्हिल दर्जा मिळवण्यासाठी शासनाकडे मागणी केली होती. त्या आधी या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे तेथे तातडीने १५ ते २० दिवसांत डॉक्टरांची नेमणूक करून त्या सोबत इसीजी, डायलेसीस, एमआरए अन्य सुविधा देण्याची सोय करण्यात येणार असल्याचे आयुक्त गोविंद बोडके यांनी स्पष्टीकरण पालकमंत्री शिंदे यांना केले. त्यासोबतच निळजे घेसर, कोळे रोड येथील कल्याण ग्रामीण विभागातील हॉस्पिटल (प्राथमिक आरोग्य केंद्रांना) सुद्धा जिल्हा विशेष दर्जा साठी मसुदा बनवणे आणि तेथेही १५ ते २५ बेडची सुविधा उपलब्ध करण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार करण्यासाठी मागणी करावी असेही ग्रामीण आरोग्य अधिका-यांनी सांगितले.

महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात दवाखाना आहे, त्या ठिकाणी डॉक्टर नसल्याने ते बंद आहेत. ते आगामी २० दिवसात सुरू करून आठवड्यातून दोन दिवस तेथेही ओपीडी सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्त बोडके यांनी पालकमंत्र्यांना दिले.केडीएमसीमधील धोकादायक इमारतीसाठीही गृहनिर्माण योजना लागू करण्यासाठीही एसआरए योजनेचा मसुदा तयार आहे. तसेच शासनाच्या कामात अडथळा आणणा-यांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भातही त्या बैठकीत चर्चा झाली. सरकारी जागेवरील सर्व रहिवाश्यांची यादी तयार करून महापालिकेला देण्यात यावी. त्यानूसार कर बुकात नोंद करून मालमत्ता कर आकारण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्त बोडके यांनी दिले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीhospitalहॉस्पिटलGovernmentसरकार