शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे अधिकारी लाटताहेत वाहनभत्ता, वर्षाला एक कोटी 25 लाखांची उधळपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:03 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी व अभियंत्यांना वाहनभत्ता दिला जातो.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेतील अधिकारी व अभियंत्यांना वाहनभत्ता दिला जातो. फिरतीवर असलेल्या अधिका-याना हा भत्ता देण्याचा ठराव मंजूर आहे. मात्र अधिकारी व अभियंते फिरतीवर न जाता महिन्याला 25 हजार रुपयांचा भत्ता लाटताहेत. महापालिकेच्या पैशाची ही उधळपट्टी थांबविण्याची मागणी जागरुक नागरिक सुरेश तेलवणे यांनी केली आहे.तेलवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्याचा पाठपुरावा करीत आहेत. महापालिकेत जवळपास 30 ते 25 अधिकारी हे महिन्याला 25 हजार रुपयांचा वाहन भत्ता घेतात. त्यांना वाहन भत्ता देण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर केला आहे. फिरतीवर असलेल्या अधिका-यांना वाहनभत्ता दिला जावा. प्रत्यक्षात वाहन कुठे फिरले याची नोंदवही तपासल्यास त्यात अधिकारी व अभियंत्यांनी वाहनाचा वापर घर ते कार्यालय या दरम्यान केला आहे. वापर कमी असताना 25 हजार रुपये घेतले जातात. 2 हजार 50 किलोमीटर महिन्याला प्रवास झाल्यावर त्याला वाहन भत्ता देण्याचा निकष आहे. या निकषाला हरताळ फासून अधिकारी वाहन भत्ता लाटत आहेत. प्रभारी अधिकारी व अभियंत्यांना वाहन भत्ता देण्याचा ठराव नसताना त्यांनाही वाहनभत्ता दिला जातो. हे तर ठरावाच्या विपरीत कृत्य प्रशासनाकडून केले जाते. राज्य सरकारच्या जीआरनुसार खासगी वाहनाचा वापर करण्यास अधिका-यांना परवानगी नाही. तरी देखील खासगी वाहनाचा वापर सर्रासपणे केला जात आहे. वाहन भत्त्यापोटी महापालिका वर्षाला 1 कोटी 25 लाख रुपये खर्च करते. वाहन भत्त्याचा वापर करून कुठेही साईड व्हिजिटला न जाणा-या अधिका-यांच्या विरोधात कारवाई केली जावी. तसेच यापूर्वी त्यांनी फिरतीवर न जाता जो काही भत्ता लाटला आहे. त्याची वसुली त्यांच्याकडून करण्यात यावी. महापालिका अनेक ठिकाणी आर्थिक चणचणीचे कारण सांगून काटकसर करते. अधिका-यांना गलेलठ्ठ पगार दिला जातो. महापालिकेतील अनेक विकासकामे लटकलेली आहे. त्यामुळे अधिका-यांचा जॉब चार्ट अत्यंत वाईट आणि असमाधानकारक आहे. त्यांना कशाला हवे वाहन व वाहनाचा भत्ता असा सवाल तेलवणे यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेतील विविध दालनातील वृत्तपत्रे बंद केली जातात. कामगारांना मागणीपेक्षा कमी बोनस दिला जातो. तशीच काटकसर अधिका-यांच्या वाहन भत्त्यात केली जावी. ही उधळपट्टी थांबली पाहिजे. याविषयी तेलवणे यांनी तत्कालीन आयुक्त ई. रविंद्रन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. येत्या आठवड्यात उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी बैठक लागवण्याचे मान्य केले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका