शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृह चालवण्याची केडीएमसीची इच्छाशक्तीच नाही, वास्तुविशारद राजीव तायशेटे यांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 20:42 IST

केडीएमसीच्या हद्दीत इनमीन दोन नाट्यगृह असून त्याची देखभाल महापालिका प्रशासनाला करता येत नाही, कारण तशी इच्छाशक्तीच त्यांच्याकडे नाही.

डोंबिवली -  केडीएमसीच्या हद्दीत इनमीन दोन नाट्यगृह असून त्याची देखभाल महापालिका प्रशासनाला करता येत नाही, कारण तशी इच्छाशक्तीच त्यांच्याकडे नाही. जे अधिकारी प्रशासनात विविध पदांवर आहेत त्यांच्या पदव्या तपासल्या की समजेल त्यांचे ज्ञान किती आहे ते? कोणालाही कुठलेही पद केवळ सेवाज्येष्ठता तत्वावर दिले गेल्यानेच शहरांची दुर्दशा झाली असल्याची टिका प्रख्यात वास्तुविशारद राजीव तायशेटे यांनी केली.तायशेटे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे वास्तुविशारद आहेत. दोन दिवसांपासून लोकमतच्या हॅलो ठाणेमधील सांस्कृतिक ठणठणाट या शिर्षकाखाली आलेल्या वृत्तांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्या पद्धतीने नाट्यगृह प्रशासनाची पोलखोल केली आहे ती योग्य असून अधिका-यांना नाट्यगृह चालवायचेच नसल्याचे ते म्हणाले. शुभारंभापासून जर इतिहास बघितला तर हे नाट्यगृह सुरु करण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी हातभार लावुनही चार आयुक्त बदलल्यानंतर प्रकल्प मार्गी लागला. इथल्या अधिका-यांना सुखवास्तु करदात्यांना द्यायच्या म्हंटल्या की अंगावर येते, म्हणुनच २२ वर्षांच्या कालावधीत अवघी दोन मनोरंजनाची सांस्कृतिक केंद्र महापालिका तयार करु शकली ही या महापालिकेची शोकांतिका आहे.कोणत्याही प्रकल्पासाठी आपात्कालीन निधी असतोच. तसा या प्रकल्पासाठी का नाही? नसेल तर तशी तरतूद का गेली नाही? असेल तर तो निधी कुठे गेला यासगळयाची चौकशी व्हावी असेही ते म्हणाले. एसीचे काम हे एकूण प्रकल्पाच्या ७ टक्केपण काम नाही. पण अन्य वास्तु धडधाकट आहे असे प्रशासन सांगू शकते का? चांगल्या वास्तुची अशी वाताहात होतांना बघवत नाही, दु:ख होते, माध्यमांनी पोलखोल करावीच असा टोला त्यांनी लगावला.