शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कासकर खंडणी प्रकरण : नगरसेवक पती-पत्नीची दिवाळीनंतर चौकशी; गोवा, रत्नागिरीसह मुंबईतील मालमत्तेचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:38 IST

खंडणीप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांना शनिवारी ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर कासकर आणि इतर तिघांविरोधात मकोकांतर्गत कारवाई केली.

ठाणे : खंडणीप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांना शनिवारी ठाणे जिल्हा विशेष न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, तर कासकर आणि इतर तिघांविरोधात मकोकांतर्गत कारवाई केली असून, त्या चौघांना दिवाळीनंतर पुन्हा लगेच अटक करणार असल्याचे आणि ठाण्यातील एका नगरसेवकासह एका नगरसेविकेच्या पतीलाही चौकशीस बोलाविणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.कासकर आणि त्याच्या दोन साथीदारांना ठाणे खंडणीविरोधी पथकाने ३ आॅक्टोबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या एका गुन्ह्यात अटक केली होती. या गुन्ह्यात त्यांना दोन वेळा पोलीस कोठडी मिळाली होती. शनिवारी त्यांना ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केले. त्या वेळी पोलिसांनी तिघांना तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने पोलीस कोठडीऐवजी तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार, त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात केली आहे.रवी पुजारीच्या हस्तकांच्या कोठडीत वाढ कासारवडवलीतील बिल्डरने खंडणी न दिल्याने, त्याच्या कार्यालयावर गोळीबारासाठी आलेल्या रवी पुजारींच्या दिनेश राय आणि नितीन राय या हस्तकांना अटक केली आहे. त्या दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली असून, त्यांना शुक्रवारी ठाणे न्यायालयाने १८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.आतापर्यंत ३१ तोळ्यांचे दागिने हस्तगतठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यातील विकलेले ४० तोळे दागिन्यांपैकी ३१ तोळ्यांचे दागिने ठाणे खंडणीविरोधी पथकाने हस्तगत केले आहेत.यामध्ये ठाण्यातील माजिवडा येथील ज्वेलर्सदाराकडून ७ तोळे, माहिमच्या ज्वेलर्सदाराकडून २० तोळे आणि मुलुंडमधील एका बारबालेकडून ४ तोळे असे ३१ तोळे हस्तगत केले आहे.त्या बारबालेला मुमताज याने हे दागिने दिले होते. उर्वरित दागिनेही लवकरच हस्तगत करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.विकत घेतलेल्या मालमत्तेचा शोधकासकरने गोवा, रत्नागिरी, तसेच मुंबईत काही मालमत्ता खरेदी केली असल्याची बाब पुढे आली आहे. त्या मालमत्तेचाही शोध सुरू असून, तसेच कासकरच्या बँक खात्याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा