शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आणि खासगी गाड्यांचे काशिमिरा उड्डाणपुलाखालील मार्गावर अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 23:02 IST

काशिमीरा उड्डाणपुला खाली पोलीस ठाण्यासमोरच्या मार्गावर पोलीस आणि खाजगी लोकांच्या गाड्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक व रहदारीला अडथळा होत आहे.

मीरारोड - काशिमीरा उड्डाणपुला खाली पोलीस ठाण्यासमोरच्या मार्गावर पोलीस आणि खाजगी लोकांच्या गाड्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक व रहदारीला अडथळा होत आहे.काशिमिरा उड्डाण पूल झाल्यानंतर पोलीस ठाण्यासमोरील असणाऱ्या मुख्य नाक्यावरुन मीरा भाईंदर शहरातून मुंबईकडे जाणारी तर ठाणे, वसई, काशिमिरासह अन्य लांब भागातून मीरा भाईंदरकडे जाणारी वाहने याच पुलाखालील मार्गिकेमधून जातात. त्यामुळे नेहमीच येथे वाहनांची गर्दी असते. त्यातच बस, खाजगी वाहनाचा प्रवास करून आलेले नागरिक काशिमिरा नाक्यावर उतरतात. शिवाय पोलीस ठाणे तसेच मुंबईला जाण्यासाठी याच पुलाखालील मार्गिकेचा वापर करावा लागतो.शहरात ये - जा करणाराया वाहनांची वर्दळ असल्याने पुलाखालील मार्गिकेवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. पादाचारींना तर चालणे जीकरीचे ठरते. बहुतांश वेळा येथे वाहतुकीच्या नियोजनासाठी कोणीच नसते. शिवाय येथे कोणतीच सिग्नल यंत्रणा नाही. त्यात भर म्हणजे पोलीसच आपल्या चारचाकी - दुचाकी गाड्या सर्रास या मार्गिकेच्या दोन्ही दिशेला उभ्या करतात.पोलीस गाड्या लावतात म्हणून काही खाजगी मंडळी देखील बेकायदा वाहने उभी करुन जातात. वास्तविक पोलीस ठाणे आवारात तसेच पुला खालील मोकळ्या जागेत वाहने उभी करण्याची सोय असताना देखील पोलिसांकडून रस्त्याचा वापर केला जातोय.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर