शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

माथेरानच्या मिनी ट्रेनमधून करा धम्माल; वीकेण्डसाठी एक फेरी वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:06 IST

शनिवारी आणि रविवारी माथेरान स्टेशन ते अमन लॉज सकाळी ८.२०,९.१०,१०.०५ व ११.३५ अशा फेऱ्या असतील.

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : अगोदरच कमी असलेल्या मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमुळे पर्यटकांत नाराजी होती. त्यात काही दिवसांपासून पर्यटकांत वाढ होत अनेकांना तिकीटच मिळत नव्हते. त्यामुळे संताप व्यक्त होत होता. अखेर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत शनिवारी व रविवारी ट्रेनची एक फेरी वाढवली आहे. इतर दिवशी नियमित आठ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे सुटीत माथेरानच्या मिनी ट्रेनमधून धम्माल मस्ती करता येणार आहे. 

 शनिवारी आणि रविवारी माथेरान स्टेशन ते अमन लॉज सकाळी ८.२०,९.१०,१०.०५ व ११.३५ अशा फेऱ्या असतील. दुपारी १.१०,२.००व ३.१५ तर सायंकाळी ४.३० व ५.२० अशा फेऱ्या होतील. अमन लॉज ते माथेरान दरम्यान सकाळी ८.४५, ९.३५ आणि १०.३० अशा फेऱ्या तर दुपारी १२.००,१.३५,२.२५ व ३.४० तसेच सायंकाळी ४.५५ आणि ५.४५ अशा फेऱ्या चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.  

खासदारांची होती सूचनाही समस्या माथेरानच्या शिष्टमंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी मध्य रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजनांसाठी सूचित केले. त्यानुसार फेऱ्यांत वाढ केली. यासाठी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, दिलीप कदम, पराग सुर्वे, माथेरान धनगर समाज माजी अध्यक्ष  राकेश कोकळे आदींनी पाठपुरावा केला होता. नेरळ माथेरान ट्रेन पावसाळ्यात बंद झाल्यावर आणखीन फेऱ्या वाढविता येतील का याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे स्टेशन मास्टर जी.एस. मीना यांनी सांगितले.

टॅग्स :Matheranमाथेरान