शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी तालुक्यातील कामवरी नदी कोरडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:19 IST

तापमानात दिवसागणिक वाढ झाल्याने पाण्याची पातळी खालावली असून उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भिवंडी तालुक्यातील टंचाई अधिक तीव्र होते आहे.

- रोहिदास पाटीलअनगाव : तापमानात दिवसागणिक वाढ झाल्याने पाण्याची पातळी खालावली असून उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत, तशी भिवंडी तालुक्यातील टंचाई अधिक तीव्र होते आहे. तालुक्यातील आदिवासीपाडे, वस्तीवाड्यांमध्ये नागरिकांना टंचाई भेडसावत असल्याचे चित्र असतानाच पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी कामवरी नदी कोरडी पडली आहे.या नदीला अनेक छोटेमोठे ओहोळ जोडलेले आहेत. पिळझे गावच्या डोंगरपायथ्यापासून उगम पावलेल्या या नदीच्या तीरावर सुपेगाव, लामज, करंजवाडी, चावे, पंडास, निवली, रोहिने, सोनटक्के, खाडपे, कशेळी, विश्वभारती, कासपाडा, गोरसई, सैनिक वसाहत, कवाड, मडक्याचापाडा, बोरपाडा, शेलार, वाघिवली, आदी गावपाडे वसलेले आहेत. ही नदी येथील शेतकऱ्यांची जीवनरेखा आहे. उन्हाळ्यात या नदीच्या पाण्यावर येथील शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. येथील शेतकऱ्यांची ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. पावसाळ्यानंतर नदीतील पाणी कमी होते. नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकºयांच्या जनावरांना पाणी मिळत नाही.या नदीतील पाण्याने शेलार येथील डाइंगला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नदी कोरडी पडते. मात्र, भिवंडी तहसील, भिवंडी पंचायत समिती आणि शेलार ग्रामपंचायत विभागाकडे यासंबंधी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यामागील कारण काय आहे, हे उमजलेले नाही.भिवंडी पंचायत समिती लघुपाटबंधारे विभागाच्या वतीने कामवरी नदीवर लाखो रुपये खर्च करून सिमेंट-काँक्रिटचे बंधारे बांधले आहेत. ठिकठिकाणी बंधाºयांचे काम केले आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बंधाºयांची दुरवस्था झाली आहे. बंधारे वाहून गेल्याने पाणी अडत नाही, याकडे लघुपाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देतील काय, असा प्रश्न येथील शेतकºयांनी उपस्थित केला आहे. याबाबत शेतकºयांनी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी शेतकºयांनी केली आहे.नदीपात्राची खोदाई करून त्यातून माती काढून खोली वाढवली, तर पाणीसाठा वाढेल आणि येथील ग्रामस्थांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. तरच शेतकºयांना दरवर्षी होणारा पाणीटंचाईचा त्रास वाचेल.>नदीतील पाणी कमी झाल्याने नदी कोरडी पडली आहे. नदीलगत लावलेल्या भाजीपाल्याचे नुकसान होत आहे. नदीपात्राची खोदाई करून खोली वाढवल्यास पाणीसाठा वाढेल, याकडे शासनाने लक्ष द्यावे.- प्रकाश पाटील, शेतकरी>यासंबंधी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडून माहिती घेणार आहे.- अशोक सोनटक्के, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी