शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kalyan's Patri Pool : कल्याणजवळील पत्रीपुलाचे पाडकाम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 12:20 IST

ब्रिटीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील रेल्वे पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

कल्याण -  ब्रिटीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील रेल्वे पत्रीपूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सकाळी 11. 12वाजता पूर्वेकडील एक स्पॅन उचलण्यात आला असून आता पश्चिम बाजूकडील स्पॅन उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अंधेरी येथील पूल दुर्घटनेनंतर या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. यात हा पूल धोकादायक असल्याचे समोर आल्याने सप्टेंबरपासूनच या पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली होती, बाजूकडील केडीएमसीच्या उड्डाणपूलावरुन सद्यस्थितीला वाहतूक सुरू आहे. दरम्यान पत्रीपूलाचे पाडकाम बघण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बाजूकडील पूलावर झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन विभाग तैनात ठेवण्यात आले आहे.  

पूर्वेकडील स्पॅन उचलण्याचं काम

पश्चिमेकडील स्पॅन उचलण्याचं काम

दरम्यान, पत्रीपूल पाडकामाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर रविवारी (18 नोव्हेंबर) सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या ६ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या काळात कल्याण-डोंबिवली स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नसल्याने रस्ते वाहतुकीवर ताण येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून केडीएमटी, एसटी आणि वाहतूक पोलिसांनी तयारी केली आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली तसेच कल्याण ते कसारा-कर्जतदरम्यान रेल्वेची वाहतूक सुरू राहणार आहे.

- ब्लॉकदरम्यान उपनगरीय गाड्या कल्याण आणि कर्जत-कसारादरम्यान धावतील- विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि डोंबिवली/ ठाणेदरम्यान चालवण्यात येतील- सीएसएमटी, दादर आणि कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि डोंबिवलीदरम्यान सेवा वेळापत्रकानुसार चालतील- सीएसएमटी येथून शेवटची फास्ट ट्रेन कर्जतसाठी सकाळी 8.16 वाजता आणि कल्याणसाठी सकाळी 9.18 वाजता सुटेल- दादर स्थानकाहून स्लो ट्रेन ही टिटवाळासाठी सकाळी 8.07 वाजता आणि कल्याणसाठी  9.17 वाजता सुटेल- सीएसएमटीसाठी शेवटची फास्ट ट्रेन आणि अप ट्रेन सकाळी 9.09 वाजता कल्याणावरुन सुटेल- सीएसएमटीसाठी शेवटची स्लो ट्रेन आणि अप ट्रेन सकाळी 9.13 वाजता कल्याणवरुन सुटेल

रद्द करण्यात आलेल्या गाड्या 1. मनमाड-एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस 2. मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस 3. भुसावळ-मुंबई पॅसेंजर4. मनमाड-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस 5. पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस6. पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन7. जालना-दादर-जालना-जनशताब्दी एक्स्प्रेस8. मुंबई-भुसावळ पॅसेंजर 19 नोव्हेंबर रोजी रद्द असेल

टॅग्स :kalyanकल्याणcentral railwayमध्य रेल्वे