शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

स्विमिंग सुरक्षेच्या गटांगळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 6:33 AM

सुट्या असल्याने स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तानिया गुप्ता (५) या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

- सचिन सागरेडोंबिवली - सुट्या असल्याने स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तानिया गुप्ता (५) या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने कल्याण-डोंबिवली शहरातील मोठ्या गृहसंकुलांमधील स्विमिंग पुलांचा आढावा घेतला असता, सुरक्षेचे दावे त्यांच्याकडून भले केले जात असले; तरी शुक्रवारच्या घटनेने त्यांच्या सुरक्षेची पोलखोल झाली आहे.कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठमोठी गृहसंकुले उभी रहात आहेत. आकर्षण उद्याने, खेळांची साधने, पार्किंग आणि जलक्रीडेचा आनंद लुटण्यासाठी स्विमिंग पूल यांचा समावेश गृहसंकुलांमध्ये केला जातो. अशा संकुलांची संख्या सुमारे १५ ते २० आहे.पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडासंकुलात तरणतलाव आहे. तो पालिका चालवते. कल्याण स्पोर्टस क्लबचे बीओटी तत्वावर कंत्राट दिले आहे. डोंबिवली जिमखान्यातही तरणतलाव आहे. रितसर शुल्क घेऊन त्यांचे योग्य कंत्राट दिलेल्या, चांगले व्यवस्थापन ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचे दिसते. कासा रियो येथील दुर्घटनेनंतर तेथील सुरक्षाव्यवस्थेचा ढिसाळपणा उघड झाला आहे. अशाच अन्य मोठ्या गृहसंकुलांचा आढावा घेता, तेथे खबरदारी म्हणून जीवरक्षक तसेच प्रशिक्षक पुरेशा प्रमाणात ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले. पण ते पूर्णवेळ उपस्थित असतात का, याचे नेमके उत्तर कुणाकडे नव्हते. जीवरक्षक नसताना कोणी पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केल्यावर ‘तुमच्या जबाबदारीवर उतरा’ असे सांगून सुरक्षारक्षक हात वर करतात असा अनुभव असल्याचे रहिवाशांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. घसघशीत मेन्टेनन्स वसूल करूनही सुरक्षेची काळजी घेत नसतील, तर तरणतलावांचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असे मतही त्यांनी मांडले.तरणतलावांचे ‘सेफ्टी आॅडिट’ होतच नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेसह सर्व संबंधित यंत्रणांकडे चौकशी केल्यावर किती ठिकाणी असे तरणतलाव आहेत, याची प्राथमिक आकडेवारीही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आणखी बळी जाण्यापूर्वी ते व्हावे, असे रहिवाशांनी सांगितले.निष्काळजीपणाचे नमुने या आधीहीच्सोसायटीच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेली दृष्टी सिंग (९) ही मुलगी बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना मे २०१६ मध्ये घडली होती. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाविरोधात खडकपाडा पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला होता.च् केडीएमसीच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये शरद परिहार (२२) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नोव्हेंबर २०१७ मध्ये घडली होती. पोहताना नशेमुळे त्याचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वीही मे महिन्याच्या सुटीत नजर चुकवून पाण्यात शिरलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला होता.

टॅग्स :kalyanकल्याणnewsबातम्या