शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

कल्याणमध्ये ‘ती’ कुटुंबे आजही जगताहेत भीतीच्या सावटाखाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 00:52 IST

नेतिवली, कचोरे टेकडीचा धोका कायम; जाळ्या लावण्याचे काम रखडले

कल्याण : मुंबईतील पश्चिम उपनगरांत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कांदिवलीजवळ दरड कोसळल्याची तर, मुंब्रा बायपास मार्गावर भूस्खलन होऊन दगडमातीचा ढीग रस्त्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे धोकादायक दरडींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पत्रीपुलानजीकच्या नेतिवली आणि कचोरे-हनुमाननगर टेकडीवरही माती खचून दरडी कोसळण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे पावसात तेथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांमध्ये भीतीचे सावट असते. धोकादायक दरडींबाबत केडीएमसीने संरक्षक भिंत तसेच जाळ्या लावण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, ते अर्धवट राहिल्याने टेकडीवरील दरड कोसळण्याचा धोका कायम आहे.कल्याणच्या दक्षिणेला पत्रीपुलाजवळ प्रशस्त पसरलेल्या हिरव्यागार नेतिवली आणि कचोरे टेकडीवर झोपड्या, चाळींचे अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी रेल्वेने मुंबईकडून कल्याणमध्ये प्रवेश करताना शहराच्या प्रवेशद्वारावर ही निसर्गरम्य टेकडी नागरिकांचे स्वागत करीत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत टेकडीच्या पायथ्यापासून सर्व जागा भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. दुसरीकडे दरडी कोसळण्याच्या भीतीने रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते.टेकडीवर आणि पायथ्याशी सुमारे साडेचारशे ते पाचशे कुटुंबे येथे वास्तव्याला आहेत. २००९ मध्ये दरड कोसळून येथे एका मुलाचा मृत्यू झाला होता. २४ जून २०१० ला दोन घरांवर दरड कोसळून तिघे गंभीर जखमी झाले होते. तर, २०११ च्या पावसाळ्यात तिघांचा मृत्यू तर, सहा जण जखमी झाले होते. २०११ च्या मार्चमध्ये घडलेल्या घटनेत येथील जयभवानीनगरमध्ये दरड कोसळून सात जण जखमी झाले होते.२०१४ मध्ये महात्मा फुलेनगरमध्ये दरड कोसळली होती. परंतु, त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, १९ सप्टेंबर २०१६ ला कचोरे येथील हनुमाननगरमध्ये दरड कोसळली होती. यावेळीही कोणतीही हानी झाली नव्हती. या घटनेनंतर नगरसेविका रेखा चौधरी यांनी संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. परंतु, हे काम अर्धवट राहिले आहे. पावसाळ्यात अथवा एखादी दुर्घटना घडल्यानंतर तेथील रहिवाशांना सतर्कतेच्या आणि स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या जातात. मात्र ठोस कारवाईअभावी त्या कागदोपत्रीच राहतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल केला जात आहे.‘ते’ काम खर्चिक : टेकडीच्या परिसरात राहणाºया रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. कचोरे येथील हनुमाननगरमध्ये टेकडीवर संरक्षक खांब लावले आहेत. परंतु, नेतिवली येथे संरक्षक जाळी आणि भिंत बांधण्याचे काम केले जाणार होते. परंतु, ते काम खर्चिक असल्याने होऊ शकलेले नाही. संबंधित जागा वनविभागाची असल्याने त्यांचीही परवानगी घ्यावी लागणार आहे.- भरत पाटील,‘जे’ प्रभागक्षेत्र अधिकारी, केडीएमसी