शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फेरिवाले हटले पण रेल्वे स्थानकातून केडीएमटीची बस सुविधा कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:30 IST

डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशाने स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलानजीकची रेल्वेने संरक्षक भिंत तोडून तेथे प्रवेशद्वार करण्यात आले होते. पण अल्पावधीतच परिवहनने सुरू केलेली ७१, ७२ क्रमांकाची बस बंद झाली.

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेला बस रेल्वे स्थानकातून सोडण्याच्या उद्देशाने स्थानकाच्या मधल्या पादचारी पुलानजीकची रेल्वेने संरक्षक भिंत तोडून तेथे प्रवेशद्वार करण्यात आले होते. पण अल्पावधीतच परिवहनने सुरू केलेली ७१, ७२ क्रमांकाची बस बंद झाली. त्यामुळे प्रवेशद्वार खुले झाले, पण बस मात्र नाही अशी स्थिती असल्याने प्रवासी नाराज आहेत. केडीएमटीच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे डबघाईत जाणारी परिवहन सेवेला चांगले दिवस येणार तरी कसे?,अशी टीका नागरिकांमधून व्यक्त होत आहे. परिवहनचे माजी सभापती भाऊ चौधरी यांनी रेल्वे स्थानक परिसरातून बस सोडण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ते कागदावरच राहिल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातील फेरिवाले हटवले आहेत. त्या पाठोपाठ रेल्वे स्थानक परिसरातून बस सुविधा द्यावी, अशी अपेक्षा डोंबिवलीकरांनी व्यक्त केली. पण त्यात केडीएमटी प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा आभाव दिसून येत आहे. त्याचा लाभ परिसरातील रिक्षा चालक घेत आहेत. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला डॉ. राथ रोड आणि पाटकर रोड परिसरातील फेरिवाले महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटवले. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान असले तरीही स्थानकातून बस सुविधा मिळालेल्या नाहीत. फेरीवाल्यांसह गर्दीमुळे स्थानक परिसरात बस आणता येत नाही, असे स्पष्टीकरण परिवहन विभागाने दिले होते, पण आता तर फेरिवाले आभावानेच दिसत आहेत.

त्यामुळे तेथे तात्काळ बस सुविधा द्या अशी मागणी नागरिकांची आहे. पण त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने राथ रोडवर जागा असूनही केळकर रोडच्या कॉर्नवरुनच शहरात बस सोडल्या जात आहेत. पाटकर रोड मार्गे तसेच स्थानकातून बस सेवा देण्यासाठी तत्कालीन परिवहन सभापती संजय पावशेंनी प्रयत्न केले होते, परंतू त्यानंतर आता पुन्हा स्थिती जैसे थे असून स्थानकातून बसची मागणीही मागे पडली आहे. त्या उद्देशाने डॉ. राथ रोडवरील एका हॉटेलचे फॅनिंगही केले, परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.

रस्ते काँक्रिटीच्या कामामुळे पश्चिमेला बसचे मार्ग बंद झाले होते. कोपर मार्गावरचे नक्की नाही, पण शहरातील रिंगरूट मात्र आता पुन्हा सुरू करू. तसेच सेवा बंद का केल्या हे प्रशासनाला विचारणार, त्यासाठी परिवहनच्या सभेत आवाज उठवणार. तसेच पूर्वेला रेल्वे स्थानकालगत बस सोडण्यासाठीही प्रयत्न करणार. - संजय पावशे, माजी सभापती, कल्याण डोंबिवली परिवहन समिती पश्चिमेकडील रेल्वे स्थानकालगत कल्याण डोंबिवली परिवहनच्या बस सोडण्यासाठी तत्कालीन सभापती संजय पावशे यांनी दोन बस सोडल्या होत्या, मात्र रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या नावाखाली त्या बस बंद करण्यात आल्या असून त्यास आता वर्ष झाले तरी त्या पुन्हा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे डोंबिवली ते कोपर मार्गावर तसेच फुले रोड मार्गे दिनदयाळ रोडवरून परत स्टेशनला येणारी बसचे मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे पश्चिमेकडे परिवहनच्या सुविधेचा आभाव असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्या बस तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे. त्या बस सोडण्यासाठी त्यांना अद्ययावत बस थांबा देखिल तयार करण्यात आला होता. त्यासाठी मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकाच्या मधल्या पादचारी पूलाला तातडीने जाता यावे यासाठी भिंत पाडण्यात आली होती. तेव्हापासून मधल्या पुलासाठी थेट जाता येत असले तरी ज्या उद्देशासाठी बस थांबा करण्यात आला होता, त्या उद्देशाला परिवहननेच हरताळ फासला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणBus Driverबसचालक