शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
3
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
4
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
5
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
6
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
7
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
8
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
9
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
10
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
11
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
12
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver १९२५ रुपयानी महागलं; Gold झालं स्वस्त, पटापट चेक करा नवे दर
14
अल-फलाहजवळ फरीदाबादच्या शेतात जमिनीखाली बंकर स्टाईल मदरसा! दिल्ली स्फोटाच्या तपासात खळबळजनक खुलासा
15
धर्मेंद्र यांच्या परिवारातील सदस्य कोण? अशी आहे 'देओल' कुटुंबाची Family Tree
16
या कारणामुळे 'स्टील किंग' लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडलं, आता कुठे स्थायिक होणार, जाणून घ्या
17
बिहार निकालाचा प्रभाव राज्यातील निवडणुकांवर पडणार? विरोधकांना धसका, सत्ताधारी निश्चिंत
18
Viral Video: पोरीने गाजवली पार्टी... साडी नेसून तरुणीचा अफलातून डान्स, अदांनी केलं घायाळ
19
वडिलांनंतर स्मृती मंधानाच्या होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; लग्न लांबणीवरच... 
20
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : राष्ट्रवादीचा हल्लाबोल अन् जनआक्रोश, महागाईचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:58 IST

शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा, भरमसाट वाढलेली महागाई आणि ऐन दिवाळीत लादण्यात आलेल्या वीजभारनियमनाच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी

कल्याण : शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा, भरमसाट वाढलेली महागाई आणि ऐन दिवाळीत लादण्यात आलेल्या वीजभारनियमनाच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी आक्रोश आणि हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले. कल्याण तहसील कार्यालय आणि ‘महावितरण’च्या तेजश्री मुख्यालयावर या वेळी निदर्शने करण्यात आली. त्यात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.प्रारंभी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११.३० च्या सुमारास येथील पश्चिमेकडील शिवाजी चौकात सुरू झालेला मोर्चा महंमद अली चौक, नेहरू चौक, रेल्वे स्थानक रोडमार्गे तहसीलवर धडकला. यात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, कार्याध्यक्ष विलास म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे, माजी नगरसेवक जे.सी. कटारिया, नंदू धुळे, उमेश बोरगावकर, श्याम आवारे, राजेंद्र नांदोस्कर, मनीषा बाळसराफ, रेखा सोनवणे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.भाजपा व शिवसेना सरकारच्या राजवटीत शेतकºयांची फसवी कर्जमाफी व भरमसाट वाढलेली महागाई, याबाबत या वेळी रोष व्यक्त करण्यात आला. सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार अमित सानप यांना निवेदन दिले. सरकारने कर्जमाफीची प्रक्रिया आॅनलाइन करत आणखी क्लिष्ट व किचकट केली. दिवाळीपूर्वी कर्जमाफी करू, असे आश्वासन देणारे सरकारनंतर शेतकºयांनी आता कर्ज भरावेत, नंतर सरकार माफ करेल, असेही म्हणायला लागले आहे, याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले.त्यानंतर, मोर्चा ‘महावितरण’च्या तेजश्री मुख्यालयाकडे वळवण्यात आला. महात्मा फुले चौक, सुभाष चौक, मुरबाड रोड, शासकीय विश्रामगृह, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून तो कर्णिक रोडवरील तेजश्री कार्यालयावर धडकला. आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावरच तेथील सुरक्षारक्षकांनी रोखले. तेथेही केंद्र सरकारच्या निषेधार्थ आक्रोश करण्यात आला. काहीवेळाने शिष्टमंडळाला कार्यालयात सोडण्यात आले. या वेळी शहरी आणि ग्रामीण भागातील अभियंत्यांशी शिष्टमंडळाने चर्चा केली. आमच्या मागण्यांची गंभीर दखल घ्या, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशारा देण्यात आला. अधिकाºयांना पदाधिकाºयांनी निवेदन सादर केले.

टॅग्स :thaneठाणेNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी