शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कल्याण-कर्जत-कसारा थेट नवी मुंबईला जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 01:36 IST

हार्बर आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सॅण्डहर्स्ट रेल्वेस्टेशनच्या धर्तीवर कळवा येथे लवकरच उन्नत रेल्वेस्थानक आकार घेणार आहे.

- नारायण जाधव

ठाणे : हार्बर आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सॅण्डहर्स्ट रेल्वेस्टेशनच्या धर्तीवर कळवा येथे लवकरच उन्नत रेल्वेस्थानक आकार घेणार आहे. हे दुमजली स्थानक बांधण्यासाठी एमआरव्हीसी अर्थात मुंबई रेल्वे विकास महामंडळाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, ते पूर्ण झाल्यावर कल्याण-कर्जत-कसा-याचे प्रवासी थेट नवी मुंबईला जाऊ शकणार आहेत. या मार्गावरील कळव्यानंतर नवी मुंबईला जोडणा-या दिघा रेल्वेस्थानकाचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. कळवा आणि दिघ्याला जोडणा-या या उन्नतमार्गाच्या संपूर्ण प्रकल्पावर ४७६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.यातील पहिला टप्पा १२८ कोटींचा असून त्यात कळवा-दिघादरम्यानच्या पारसिक डोंगराजवळून जाणा-या पुलासह दिघास्थानकाचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एमयूटीपी-३ अंतर्गत रेल्वे जागतिक बँकेकडून कर्ज घेणार आहे.फलाटांत होणार बदल :कळवा-मुंब्रादरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वेलाइनचे काम सुरू असून हे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे. यात मुंब्रा स्थानकात होणाºया दोन नव्या प्लॅटफॉर्मवर धीम्या गतीची लोकल थांबवण्यात येणार असून विद्यमान प्लॅटफॉर्मवरून जलद लोकल धावणार आहेत.तर, कळवा स्थानकातील नव्या प्लॅटफॉर्मवरून जलद लोकल धावणार असून सध्याच्या प्लॅटफॉर्मवरून धीम्या गतीच्याच लोकल धावतील, असे सांगण्यात आले.ठाणे रेल्वे स्थानकाचा भार कमी होणार- कळवा आणि दिघा स्थानकांस जोडणाºया उन्नतमार्गाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ही लाइन दिघा स्टेशननंतर एलिव्हेटेड सेक्शनवर चालवली जाईल. ती कळव्यातून पुढे जाईल.- हे काम पूर्ण झाल्यावर नवी मुंबईला येजा करणाºया कल्याण-कर्जत कसाºयाच्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण, एकदा ती सुरू झाली की, या प्रवाशांना नवी मुंबईकडे जाण्यासाठी ठाणे स्थानकात उतरून पुन्हा ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल पकडावी लागणार नाही.- या नव्या मार्गाने ते थेट कळव्याहून दिघामार्गे नवी मुंबईला जाऊ शकणार आहेत. यामुळे ठाणे स्थानकावरील मोठा ताणही कमी होणार आहे.नव्या स्थानकांत या सुविधा...नव्या उन्नत कळवा स्थानकात बेस्टलेस ट्रॅकसह रेल्वे फ्लायओव्हरची योजना आखली आहे. शिवाय प्लॅटफॉर्म, बुकिंग आॅफिस, कनेक्टेड भुयारी पादचारी मार्ग, जिना, कॅफेटरिया, प्रसाधनगृह आणि तत्सम कामांचा समावेश आहे.

टॅग्स :localलोकल